Sunday, January 27, 2013

रामदरा
रामदरा येथील सुंदर निसर्ग, थेऊरचा चिंतामणी, भुलैश्वरचे मनाला भुरूळ घालणारे अद्भूत असे शिल्प, रांजणगावचा महागणपती असे प्रवास नुकताच झाला. त्या विषयी..

सकाळी घरातून लवकर निघता निघता 11 वाजले. त्यातून आज रविवार त्यामुळे हडपसरला नेहमीपेक्षा थोडी जास्तच गर्दी होती. हडपसर सोडून सोलापूर हायवेला गाडी आली. टोल भरून रामदरा पाहण्यास निघालो.
पुण्याकडून येताना उजव्या हाताला रामदरा असा फलक लावला आहे. सुमारे 4 किलोमीटरवर एकरी रस्त्यावरून शेतीशेजारून  हा रस्ता आपल्याला रामद:यावर घेऊन जातो.  रामदरा हे एक नैसर्गिक तळ्याकाठी असलेले छोटय़ाश्या डोंगरावरील देवस्थान आहे.  गाडीवरर्पयत जाते. डोंगर आहे हे प्रथम कळतच नाही. उंचावर असलेल्या या ठिकाणी मोठे तळे आहे. इथे शंकराची देऊळ आहे. विशेष म्हणजे मंदिरातील खांबांवर अनेक देव-देवता आणि ऋ षिंचेमुनींचे पुतळे कोरले आहेत. अतिशय प्रसन्न वातावरण आणि  शांत तळे,  सुंदर निसर्ग असा येथील देखावा आहे. मंदिरात दुर्वासा ऋषी,  स्वामी विवेकानंद, विभीषण, सनत्कुमार, वासुदेव, धन्वंतरी, वेदव्यास, गोरा कुंभार, ज्ञानेश्वर, तुकाराम असे छोटय़ा आकारातील रंगीत पुतळे येथे आहे. पावसाळय़ात या ठिकाणीचा परिसर विलोभनीय दिसतो. नारळाची मोठमोठी झाडे लावून परिसर सुंदर केला आहे. मंदिरात दत्ताची मूर्ती, राम, लक्ष्मण, सीता व त्यांच्यासमोर शंकराची पिंड असा सर्व देवांचा मिलाप या ठिकाणी दिसतो. गाभा:याच्या बाहेर हनुमानाची मूर्ती सुंदर आहे.
येथून पुढे थेऊरचा गणपती पाहण्यास निघालो.कसे जायचे ? :

लोणी काळभोर गावाच्या थोडेसे पुढे लोणी फाटा लागतो.
पुण्याकडून येताना प्रथम रामदरा नंतर थेऊरचा  गणपती व भुलेश्वर असा प्रवास करता येतो.

  • पुणे ते रामदरा : 24 किलोमीटर
  • पिंपरी ते रामदरा : 38 किलोमीटर
  • थेऊर ते रामदरा :  12 किलोमीटर

भुलेश्वरचे मनाला भुरूळ घालणारे अद्भूत शिल्प

3 comments:

raju said...

सुंदर, खूप छान. अतिशय उपयुक्त माहिती,प्र.ची.

Nishikant said...

धन्यवाद

Satu said...

Thanks for this information

कॉपी करू नका