Saturday, November 12, 2022

किहीम समुद्रकिनारा

किहीम समुद्रकिनारा
दिवाळीची जोडून सुट्टी आल्याने समुद्राचे दर्शन घेण्यासाठी सकाळी निघालो. वाटेत असणाºया महाड या अष्टविनायकाचे दर्शन घेण्यासाठी थांबलो. सुट्टी असल्याचे गजाननाचे दर्शन घेण्यासाठी तासभर रांगेत उभे राहावे लागले. तेथून पेणमार्गे किहिम समुद्रकिनाºयाला जाण्यासाठी निघालो. वाटते वडखळ नाक्यावर प्रचंड वाहतुककोंडीचा सामाना करावा लागाला. छोट्याश्या जागेत प्रचंड वाहतुककोंडी झाली होती. सुमारे तासाभरानंतर मुंगीच्या गतीने ट्राफिकला शुभेच्छा देत पुढे निघालो. अलिबागला न जाता किहिमच्या समुद्रकिनाºयावर गर्दी तशी कमी असल्याने आम्ही तिकडे गेलो. चौंडी फाट्यावरून १० मिनिटात असलेल्या गावात प्रवेश झाला. राहण्याची व्यवस्था करून चहा घेऊन समुद्रकिनाºयावर जाण्यासाठी निघालो. 

किहिमचा समुद्रकिनारा
भरती ओहोटीचा अंदाज पाहूनच येथे यावे लागते. कारण आहोटीच्या वेळी येथील समुद्र खूपच आतमध्ये जातो. सुमारे अर्धा किलोमीटर अंतर. अलिबागच्या किल्ल्यावर जसे आहोटीच्या वेळी चालत जाता येते नंतर मात्र, चारही बाजुने समुद्र असतो. त्याप्रमाणेच येथेही समुद्र भरतीच्यावेळी आत जातो. या किनाºयावर प्रवाळ खूप दिसून येते. किनाºयावर खडक असून, पायात चप्पल, बूट नसल्यास जखम होण्याची शक्यता असते. येथे शंकराची पिंड असून, त्याचे दर्शन घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात. समुद्र आत गेल्यामुळे साहजिकच पोहण्यापासून वंचित राहावे लागले. मात्र, दुसºया दिवशी सकाळी ९ वाजता पुन्हा बिचवर आलो.  ओहोटी सुरू झाली होती. रात्री दिसत असलेले खडक आता पाण्यात गेले होते. समुद्रकिनाºयावर भगवा झेंड्याचे निशाण दिसते. तेथपर्यंत भरती आल्यावर पाणी येते. मनसोक्त डुंबूण्याचा आनंद घेतला. दुपारी जाता जाता अलिबागचा किल्ल्याचे लांबूनच दर्शन घेतले. 

अलिबागपासून १२ कि.मी. अंतरावर इतर किनाºयांप्रमाणेच निसर्गाचे वरदान लाभलेला किहीमचा रम्य किनारा. अलिबाग-रेवस रस्त्यावरील किहीम फाटयावर उतरल्यावर हा रस्ता किहीम गावातून समुद्रकिनारी जातो. अनेक नैैसर्गिक सौंदर्यस्थळे छायाचित्रणासाठी या किनाºयावर आढळतात.   त्यामुळेच या किनाºयाावर पर्यटकांची गर्दी असते. 

सृष्टीसौंदर्यात भर टाकणारा स्वच्छ अथांग सागर पर्यटकांना नेहमीच आग्रहाचे निमंत्रण देत असतो. मात्र, येथे येणारे काही हुल्लड पर्यटक याचा दुरपयोग करतात. प्लॅस्टिक बॉटल्स, पिशव्या, सिगरेट, दारूच्या बाटल्या टाकून समुद्रकिनारा घाण करतात. या ठिकाणी काही प्रमाणात हे दिसून येते. येथे पोलिसांची गस्त असणे आवश्यक आहे. 

राहण्याची सोय : 
चौंडी फाट्यावरून दोन किलोमीटर असलेल्या किहिम समुद्रकिनाºयावर अनेक जणांची घराच्या आवारात पर्यटकांसाठी राहण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. कोकणातील समुद्र किनाºयावरील पर्यटनाप्रमाणेच या ठिकाणी बाराही महिने किहीम गावात घरगुती रहाण्याची तसेच भोजनाची व्यवस्था होते. अनेक ठिकाणी ‘होम स्टे’चा पर्याय येथे उपलब्ध आहे. साधारणपणे १५०० ते २००० (एसी) असे येथील एका रुम्सचे दर आहेत. पर्यटनाच्या कालावधीनुसार यात कमी जास्त फरक पडतो. शनिवार व रविवार तसेच दिवाळी,उन्हाळ्याच्या सुटट्यांमध्ये पुणे - मुंबईकडील पर्यटक येथील समुद्रकिनारी येतात. त्यावेळी मात्र, दर वाढलेले असतात. 
चौंडी फाट्यावरून आतमध्ये प्रवेश केल्यावर काहीच अंतरावर असलेल्या तलावाशेजारीच आम्हाला राहण्याची संधी मिळाली. त्यांचा फोटो येथे पर्यटकांसाठी उपलब्ध केला आहे. यात माझा काही आर्थिक फायदा नाही. शेजारीच मोठा तलाव असून, संध्याकाळी व सकाळी वातावरण छान असते. शेजारीच शंकराचे प्राचीन मंदिन भिलेश्वर आहे. या शिवाय हॉटेल देखील उपलब्ध आहे. मात्र त्याचे दर पाहता होम स्टे केलेलाच चांगला. 

पर्यटकांची लय’लूट’

येथे पर्यटनासाठी येणाºया पर्यटकांचा खिसा कसा कमी होईल. याकडे येथील हॉटेल व्यावसायिकांचे लक्ष लागलेले असते. बर हा प्रकार केवळ किहिमलाच आहे असा नाही तर अलिबाग, सिंधुदुर्ग ते गोव्यापर्यंत असलेल्या समुद्रकिनारी पहायला मिळाला. येथे हॉटेलमध्ये ४० रुपयांना पंजाबी रोटी, नान, जेवणाची थाळी २५० रुपये, नॉनव्हेजचे दर ३०० रुपयांपासून पुढे तेही लिमिटेड. तर समुद्रकिनारी उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये १५ रुपयांना वडापाव (तोही भजी साईजचा छोटा) सिंगल मॅगी (.... बस २ मिनिटांवाली) ५० रुपयांना. पर्यटनाला आल्यामुळे नाईलाजास्तव खिसा रिकामा होतो. आव्वाच्या सव्वा येथील दर पाहता येथील व्यावसायिक एकाच वेळी वर्षभराचा धंदा करून मोकळे होतात. यावर उपाय म्हणजे घरून तयार करून नेलेले पदार्थ खाणे व पैसे वाचविणे. कारण एवढी महागाई पुणे व मुंबईला पर्यटनस्थळे असून देखील नाहीत. पुण्यात १० रुपयांना वडगाव अद्यापही मिळतो. डोसा उत्तप्पाचे दर २५ ते ३० रुपयांपर्यंत असतात. तेच दर येथे ७० ते ७५ रुपयांना. साधी मिसळ देखील ८० ते १०० रुपयांपर्यंत कशासाठी ? असा प्रश्न पर्यटकांना साहाजिकच येथे आल्यावर पडतो. 
समुद्रकिनाºयावरील व्यावसायिकांनी तरी या गोष्टीकडे पाहायला हवे नाहीतर येत्या काही काळात केवळ पर्यटनासाठीच लोक येथे येतील. 

कसे जावे :
पुणे-ताम्हीणी घाटमार्गे जिंजरा किल्ला पाहून अलिबाग येथून १२ किलोमीटरवर किहीम बिच आहे. 
पुणे - लोणावळा - पेणमार्गे  - मुंबई गोवा महामार्गावरील वडखळ नाकापासून किहिमला जाता येते. 
पुण्यापासून १७० किलोमीटरवर तर मुंबईपासून साधारणपणे १०८ किमी आहे. 
मुंबई, पुणे येथे अलिबागला जाणाºया भरपूर एसटी बसेस आहेत. 

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

कणकेश्वर मंदिर, अलिबागचा किल्ला, बिर्ला मंदिर, मराठी साम्राज्याच्या नौदलाचे प्रमुख आंग्रे यांची समाधी आक्षी, नागाव, रेवदंडा, वरसोली, सासवणे, थाळ, मांडवा


आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला.... या विषयी जरूर कळवा

कॉपी करू नका