Sunday, January 27, 2013

रांजणगावचा महागणपती


 

            पुणे-नगर रस्तावर शिरूर तालुक्यात रांजणगावचा  अष्टविनायकातील हा गणपती आहे. हे ठिकाण पुणे जिल्हय़ात येते.  मुख्य रस्त्यापासून जवळच मंदिर आहे. अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती. गणपतीला महागणपती असेही म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. हा गणपती उजव्या सोंडेचा आहे. मंदिराचा दरवाजा पूर्वेकडे आहे. देवळाचा मुख्य गाभारा व मंडप अजूनही चांगल्या स्थितीत आहे. मराठेशाहीत अनेक सरदारांनी या देवळाला इनामे दिली होती . मंदिराचे दोनही गाभारे थोरले माधवराव पेशवे यांनी जीर्णोद्धार केला आहे. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तीमान असे महागणपतीचे रूप आहे.
             येथील देवस्थान कमिटीने सध्या मोठय़ा प्रमाणात चांगला जीर्णोद्धार सुरू केला आहे.  गणपतीचे 5, 10, 15 व 25 ग्रॅम मध्ये चांदीची  नाणी येथे विकत मिळतात. देवस्थानने मोठा सभामंडप बांधला आहे. सकाळी व सायंकाळी या ठिकाणीही अन्नछात्रलय  आहे. प्रवेशद्वारावर आकर्षक दोन हत्तींचे मोठे पुतळे उभारलेले आहे. मोठय़ा कमानीतून आपण प्रवेश करतो. येथे गाडय़ा पार्किगसाठी मोठे वाहनतळ, स्वच्छतागृह उभारलेले आहे. मंदिराच्या बाहेर परिसरात गावागावातून आलेले शेतकरी भाजीपाला विकत होते. संध्याकाळचे 7 वा. आम्ही रांजणगावला पोहचलो. दर्शन घेऊन पुण्याकडे 7.30 ला निघालो.

रामदरा
रामदरा येथील सुंदर निसर्ग, थेऊरचा चिंतामणी, भुलैश्वरचे मनाला भुरूळ घालणारे अद्भूत असे शिल्प, रांजणगावचा महागणपती असे प्रवास नुकताच झाला. त्या विषयी..

सकाळी घरातून लवकर निघता निघता 11 वाजले. त्यातून आज रविवार त्यामुळे हडपसरला नेहमीपेक्षा थोडी जास्तच गर्दी होती. हडपसर सोडून सोलापूर हायवेला गाडी आली. टोल भरून रामदरा पाहण्यास निघालो.
पुण्याकडून येताना उजव्या हाताला रामदरा असा फलक लावला आहे. सुमारे 4 किलोमीटरवर एकरी रस्त्यावरून शेतीशेजारून  हा रस्ता आपल्याला रामद:यावर घेऊन जातो.  रामदरा हे एक नैसर्गिक तळ्याकाठी असलेले छोटय़ाश्या डोंगरावरील देवस्थान आहे.  गाडीवरर्पयत जाते. डोंगर आहे हे प्रथम कळतच नाही. उंचावर असलेल्या या ठिकाणी मोठे तळे आहे. इथे शंकराची देऊळ आहे. विशेष म्हणजे मंदिरातील खांबांवर अनेक देव-देवता आणि ऋ षिंचेमुनींचे पुतळे कोरले आहेत. अतिशय प्रसन्न वातावरण आणि  शांत तळे,  सुंदर निसर्ग असा येथील देखावा आहे. मंदिरात दुर्वासा ऋषी,  स्वामी विवेकानंद, विभीषण, सनत्कुमार, वासुदेव, धन्वंतरी, वेदव्यास, गोरा कुंभार, ज्ञानेश्वर, तुकाराम असे छोटय़ा आकारातील रंगीत पुतळे येथे आहे. पावसाळय़ात या ठिकाणीचा परिसर विलोभनीय दिसतो. नारळाची मोठमोठी झाडे लावून परिसर सुंदर केला आहे. मंदिरात दत्ताची मूर्ती, राम, लक्ष्मण, सीता व त्यांच्यासमोर शंकराची पिंड असा सर्व देवांचा मिलाप या ठिकाणी दिसतो. गाभा:याच्या बाहेर हनुमानाची मूर्ती सुंदर आहे.
येथून पुढे थेऊरचा गणपती पाहण्यास निघालो.कसे जायचे ? :

लोणी काळभोर गावाच्या थोडेसे पुढे लोणी फाटा लागतो.
पुण्याकडून येताना प्रथम रामदरा नंतर थेऊरचा  गणपती व भुलेश्वर असा प्रवास करता येतो.

  • पुणे ते रामदरा : 24 किलोमीटर
  • पिंपरी ते रामदरा : 38 किलोमीटर
  • थेऊर ते रामदरा :  12 किलोमीटर

भुलेश्वरचे मनाला भुरूळ घालणारे अद्भूत शिल्प

भुलेश्वरचे मनाला भुरूळ घालणारे अद्भूत शिल्प

श्री भुलेश्वर मंदिर (यवतचे पुरातन शिवमंदीर)

रविवार सुट्टीचा दिवस त्यातच 26 जानेवारीची सुट्टी जोडून आलेली. मग काय रविवारी सकाळीच अष्टविनायकातील थेऊर गणपतीचे दर्शन घेऊन रामदरा, भुलेश्वर व नंतर रांजणगावचा महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी निघालो. त्या विषयी..


               भुलेश्वर हे प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे.  सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत यवतच्या नैऋत्य दिशेला 700 फूटावर भुलेश्वर मंदिर आहे. 13 व्या शतकात देवगिरी यादवांच्या काळात हेमाडपंती बांधकामाची अनेक मंदिरे निर्माण करण्यात आली.  याच शतकाच्या मध्यास मंदिराचे बांधकाम झाले असावे.    पुणे शहराच्या दक्षिणोकडे भुलेश्वर रांग म्हणून ओळखली जाणारी सह्याद्रीची ही उपरांग आहे. ही रांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेत सिंहगड असून दिवे घाटाजवळ सोनोरी ऊर्फ मल्हारगड हा किल्ला आहे. याच रांगेत दौलतमंगळ (भुलेश्वर) किल्ला आहे.  आता फक्त किल्याचे जुने अवशेष उरले आहेत. दौलतमंगल आता भुलेश्वराची अप्रतिम अशी दगडात कोरलेली शिल्पांसाठी ओळखले जाऊ लागले आहे. भुलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे.  पुरातत्त्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरिक्षत स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. पण येथेही पुरातत्व विभागाचे इतर स्थळांप्रमाणोच दुर्लक्ष आहे. पार्वतीने शंकरासाठी नृत्य केले व नंतर हिमालयात जाऊन लग्न केले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. रामायण व महाभारतातील अनेक प्रसंग इथे कोरलेले आढळतात. हे मंदिर संपूर्ण दगडी आहे.

जावे कसे  :

               पुण्यातून जाणार असल्यास दोन मार्ग सोयीचे आहेत. पहिला मार्ग पुणे-दिवे घाटातून सासवड-आंबळे-माळशिरस मार्गे भुलेश्वर असा रस्ता आहे. दुसरा मार्ग दक्षिणोकडून यवत मार्गे  पुणे-सोलापूर रस्त्यावरील आहे. यवतच्या अलीकडे अंदाजे 3 किलोमीटर  पुण्याकडून सोलापुरकडे जाताना, उजवीकडे एक कालव्याच्या बाजुने एक रस्ता आत जातो. येथे कुठलीही पाटी लावलेली दिसली नाही. विचारात विचारात फाटा गाठला. रस्ता मंदिरार्पयत चांगला आहे. पुण्याहुन 45 किमी अंतरावर सोलापूर रोडवर यवतच्या अलिकडे 3 किलोमीटरवर भुलेश्वर फाटा आहे तेथून 7 किलोमीटरवर हे मंदिर आहे. या रस्त्यावरून भुलेश्वरचा डोंगर ओळखता येतो. कारण डोंगरावर एक भला मोठा बीएसएनएलचा टॉवर उभा आहे.  जाताना एक छोटा घाट लागतो. घाट संपताच उजव्या बाजूला भुलेश्वरच्या डोंगरावर जायचा रस्ता आहे. डोंगरावर जाण्यासाठी पाय:या आहेत. ज्यांना फोर व्हिलर चालवायची सवय नाही. अशांनी गाडी येथेच पार्क करावी कारण येथून पुढचा थोडाच रस्ता अवघड आहे. एकदम वर चढणारा शॉर्प टर्न आहे. चुकल्यास गाडी नक्कीच खाली येईल. तेव्हा सावधान. फक्त एकच फोर व्हिलर वर किंवा खाली जाऊ शकते. एकदम दोन वाहने समोर आली तर वाट द्यावी लागते. माळशिरस हे गाव किल्ल्याच्या पायथ्याला आहे. दौलतमंगळ किल्ल्यामधील भुलेश्वर मंदिरापर्यंत गाडीरस्ता झालेला आहे. किल्ल्याची काही तटबंदी तोडून हा रस्ता केलेला आहे.

दिसणारा परिसर : 

               पुरंदर, सिंहगड किल्ला दिसतो. जेजुरी, सपाटीवरचा प्रदेशही पहाता येतो. येथून जवळच जेजुरी, नारायणपूर व केतकवळेचा बालाजी आदी ठिकाणी आपण भेट देवू शकतो.

भुलेश्वरबद्दल थोडी माहिती

               मंदिरास भुलेश्वर किंवा यवतेश्वर असेही म्हणतात. मंदिराचे बांधकाम 13 व्या शतकातले असुन भिंतीवरील कोरीवकाम व मूर्तीकाम केलेले आहे. या मंदिराची बांधणी दक्षिणोकडील होयसळ मंदिराप्रमाणो आयताकृती व पाकळय़ासमान आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून आहे. अर्धखुला मंडप, मधला भाग आणि मुख्य गाभारा असा या मंदिराचा परिसर आहे. या मंदिरासमोर नंदीमंडपही आहे. मोगल लढाईच्या काळात ब:याच मूर्तीची तोडफोड झालेली आहे. पण तरीही ज्या मूर्ती तडाख्यातून वाचल्या त्याचे वर्णन करणे शक्य नाही. गाभा:यात शिवलिंग आहे. शंकराच्या पिंडीखाली खोबणीमध्ये जर प्रसाद ठेवला तर तो खाल्यासारखा आवाज येतो व नंतर प्रसाद खाल्लेला दिसतो. अशी येथे कहाणी सांगितली जाते. पुजा:याने आम्हाला पिंडीचा वरचा भाग उचलून दखविला.
किल्ल्याची तटबंदी, बुरु जांचे काही अवशेष आजही उभे आहेत. किल्ल्याचा दरवाजा, पाय:यांचा मार्ग, पाण्याची टाकी पहायला मिळतात. किल्ल्याचे भग्नावशेष पाहून मन खिन्न झाले. 7 ते 8 वर्षापूर्वी येथे गेलो होतो. तेव्हा परत संपूर्ण परिसर पहाणे व्यर्थ होते. मुख्य मंदिराच्या बाहेरून भिंत बांधलेली आहे. या भिंतीवरून संपूर्ण मंदिराला प्रदशिणा घालता येते. मात्र, प्रदशिणा घालताना उंचावर असल्याने थोडी भीतीही वाटते. मध्येच मुख्य मंदिराची छोटी खिडकी आली की गार वा:याची झुळूक येते. येथून आजुबाजूचा परिसर छान दिसतो.
                सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे  17 व्या शतकात मराठा राजवटीत बांधलेली आहे. पहिले बाजीराव पेशवे व साताराचे शाहू महाराज यांचे गुरू ब्रम्हेंद्रस्वामी यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. जीर्णोद्धारामुळे हे मंदिर हेमाडपंथी-मराठा संमिश्र वास्तुशैली झालेली आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते. माळशिरस गावातून श्रवण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. मंदिरात मानवी व देवतांची शिल्पकलाकृती आहेत. देवळाभोवती अनेक देवतांच्या मूर्ती आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अध्र्या भिंतींवर  युद्धप्रसंग, सिंह, हत्ती व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत.  द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही शिल्पे कोरलेली आहेत. कुंभ, कमळ, मखर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे कोरलेली आहेत. येथे दगडात कोरलेली स्त्री व तिने वापरलेले अलंकार अतिशय सुंदर आहेत. मंदिराचा मुख्य गाभारा खोल असून समोर काळय़ा दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. पिंडीमागे  संगमरवरी दगडावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोप:यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रम्हा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसिर्गकरित्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात.  मंदिराच्या बाहेरील बाजूस गणोशाचे स्त्री स्वरूपातले दुर्मिळ शिल्प आहे.
             भुलेश्वरचे दर्शन घेऊन रांजणगावला जायचे अचानक ठरले मग रस्ता विचारून यवतला पोचलो.  संध्याकाळाचे 5 वाजले होते. तेथून केडगाव मार्गे, रिलायन्स गॅस पंप, घोडेगाव सहकारी साखर कारखाना, न्हावरा फाटा, आंबळे, कर्डेगावातून पाईप लाईन शेजारून रस्ता कापत अखेर रांजणगावच्या गणपतीला 7 ला पोचलो. हे अंतर सुमारे 50 किलोमीटर होते. 

रामदरा

रांजणगावचा महागणपती

कॉपी करू नका