Wednesday, April 20, 2011

गोवा पर्यटन..!गोवा पर्यटन..!


बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल्याने यावर्षी कुठेतरी लांब ¨हडायला जायचे ठरले. अर्थातच सुमद्रकिनारी. मग माहिती घेऊन गोव्याला जाण्याचे पक्के केले. सुरेश परबच्या मित्रने लगेच ओळखीचे कळंगुटला हॉटेल बुक करून दिले. तेथे मुक्काम करण्याची चांगली सोय झाली.
गोव्यातील पर्यटनाची सुरूवात या राजधानी असणा-या पणजी शहरापासूनच होते. गोव्यात प्रामुख्याने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोन विभाग आहेत. पणजी हे शहर उत्तर गोव्यात आहे. गोव्यात जाण्यासाठी योग्य वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च हा काळ होय.


आमचा प्रवास

सायंकाळी 4 ला पुण स्टेशनवरून निजामउद्दीन-वास्को द गामा रेल्वेने प्रवास सुरू झाला. वाटेत उरळीकांचनला पोलिसांनी दरवाजे बंद करण्याच्या सूचना दिल्या. घरून आणलेले जेवण जेऊन रात्रभर प्रवासाचा आनंद घेत जागलो. मिरज जंक्शनला गाडी थांबली तेथून बराच वेळ जागा होतो. मडगाव रेल्वेस्टेशनवर सकाळी 7 ला उतरलो. तेथून बसची सोय पटकन होत नाही. प्रायव्हेट कार आहेत मात्र त्या पणजीला घेऊन जाण्यासाठी 1000 रुपये मागतात. अर्थातच रेल्वेस्टेशनवरून थोडे अंतर चालून गेल्यावर मोठय़ा रस्तावर आलो. तेथून पणजीला जाणा:या कदंबच्या बसेस आहेत.  अतिशय स्वस्त दर आहेत. किरकोळ तिकीट असते. 10 रुपये, 5 रुपये असे. पणजी येथे राज्यातून बसेस येतात. गोव्यात सर्वच ठिकाणी बसेस उपलब्ध आहे. चौकशी करून पणजीहून कळंगुटला जाणारी बस पकडली.
कळंगुटला पोहचल्यावर हॉटेलमध्ये जाऊन रुम ताब्यात घेतली. फ्रेश होऊन लगेच बिचवर जायचे ठरले. उन्हाळा असला तरी ढगाळ वातावरणामुळे उन जाणवत नव्हते. कळंगुटपासून बस करून जवळच असलेल्या बिचवर गेलो. उन नसले तरी समुद्राची वाळू गरम गरम पायाला भाजत होती. किना:यावर एक मोठे जहाज दुरुस्तीसाठी लंगर टाकून थांबले होते. एवढे मोठे जहाज प्रथमच प्रत्यक्ष पाहत होतो.

कळंगुट बीच
 
बागा बीच - कलगुंट आणि अंजुना बीचच्या मधे हा बीच आहे. म्हापसा येथून 1 कि.मी. अंतरावर हा बीच आहे. इतर समुद्रकिना:यांच्या तुलनेत इथे गर्र्दी थोडी कमीच मिळाली. हॉटेल्स चांगले आहेत. पणजीपासून हा बिच 6 किलोमीटरवर आहे. आमच्या हॉटेलपासून हा बिच 1 किलोमीटरवर होता. त्यामुळे दोन-तीनदा या बिचवर जाऊन आलो.
हॉटेल मालकाला विचारून तेथून टुरिस्ट बस बुक केली. बस सकाळी 7 ला येणार होती. दुस:या दिवशी टूर कंपनीची बस आली. आम्ही तयार होतो. हॉटेल खाली एक छोटे हॉटेल होते. तेथे उपमा व चहा चांगला पोटभर खाल्ला. माणसी 250 रुपये असे या टूरचे पॅकेज होते. प्रथम नॉन एसीचे दर दिले होते. मात्र, टूरवाल्याने एसी चालू करून 50 रुपये जादा घेतले.
प्रथम त्यांनी जुन्या पणजीला बस नेऊन तेथील प्रेक्षणीय स्थळे दाखवायला सुरूवात केली.

सेंट झेवियर्स  चर्च 

गोव्यातील एक ख्रिस्त धर्म प्रसारक सेंट झेवियर्स  यांचे मृत शरीर या चर्चमध्ये एका पेटीत जतन करून ठेवले आहे. दर 10 वर्षांनी हे शरीर दशर्नासाठी बाहेर काढले जाते. या चर्चमधील कोरीव नक्षीकामही उत्कृष्ट आहे. गोव्यातील सर्वाधिक लोकप्रिय चर्च आहे. येथे संघम चित्रपटातील बरेचसे शुटिंग झाले आहे. चर्च मोठे असून, या चर्चसमोर रस्ता ओलांडून आणखीन एक चर्च आहे.  
 

चर्च ऑफ अवर लेडी ऑफ रोजरी

गोव्याच्या प्राचीन चर्चपैकी हे एक चर्च आहे.  पोर्तगीज अल्फान्सो दी अलबुकर्क सन 1590 मध्ये या चर्चमध्ये आले होते. त्याचा तपशील येथे दिला आहे. चर्चमध्ये चित्रे रेखाटण्यात आली आहेत.तेथून पुढे टूरवाल्यांनी प्राचीन गोवा संग्राहलाय दाखवायला नेले. प्रवेश फी फक्त 250 रुपये प्रति माणसी असल्याने अर्थातच पाहिले नाही. बघणा:यांनी सुद्धा जास्त काही खास नसल्याचे सांगितले.दुपारी 12.30 ला त्यांच्या ओळखीच्या हॉटेलमध्ये नेऊन जेवण करण्यास सांगितले. जेवण करून श्री शांतादुर्गा मंदिर पाहण्यास निघालो.

श्री मंगेश मंदिर

पणजीपासून 23 किलोमीटरवर असलेल्या फोंडा येथे हे भगवान शंकराचे भव्य मंदिर आहे.  पांढ:या शुभ्र रंगाने मंदिर रंगवलेले आहे. मंदिरा समोर एक उंच दीपमाळ आहे. ही दीपमाळ भव्य आणि सुंदर आहे. मंदिराच्या समोरच एक बांधकाम केलेलं स्वच्छ पाण्याचं तळं आहे.  पांढ:या शुभ्र रंगाचे हे मंदिर आहे. मंदिर 400 वर्षे जुने असल्याचे येथे सांगितले जाते. चहूबाजूने हिरवळ व डोंगरांनी वेढलेले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे हे गाव.


शांतादुर्गा मंदिर 

पणजीपासून अंदाजे 33 कि.मी. अंतरावर असणा:या कवळे  या ठिकाणी हे श्री शांतादुर्गा मंदिर आहे. या मंदिराचा कळस सुंदर आहे. गोव्यात पाऊस जास्त. त्यामुळे  येथील मंदिराचे रुप सुद्धा महाराष्ट्रातील मंदिरांपेक्षा वेगळे दिसले. ािस्ती धर्म, पोर्तगीज धर्मचा येथील मंदिर बांधणीवर असलेला प्रभाव चांगला दिसला. मंदिर सुरेख आहे.


मत्सालय
नाव आठवत नाही पण मत्सालय पाहायला गेलो. या मत्सालयात 5क् रुपये तिकीट होते. पैसे वसूल झाले. वेगवेगळय़ा जातीचे मासे येथे होते. हातात जिवंत लॉबस्टर आपल्याला येथे पकडता येतो. अर्थात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच.

दोना पोला


प्रेमी युगुलांचे आकर्षण असलेले हे ठिकाण असून, या ठिकाणी दोना आणि पोला या दोन प्रेमी युगुलांच्या प्रेमाची आठवण करून देणारा त्यांचा पुतळा आहे. येथे एक दुजे के लिय, सिंघम हे चित्रपट शुटिंग केले आहे.

वाघातोर बीच

पणजी शहरापासून 24 कि.मी. अंतरावर हा बीच आहे. हा बीच आपल्याला एक दुजे के लिए या चित्रपट सुद्धा येथेच शूट केला.

संध्याकाळी 6 ला पणजीला परत आलो. तेथे मांडवीनदीत पर्यटकांसाठी खास छोटय़ा लॉचवर असतात. त्याचे दर माणसी 150 रुपये आहे. जहाजावर पर्यटकांच्या मनोरंजनासाठी खास ऑर्केस्ट्राची सोय केलेली असते. या पार्टीत आपल्याला कोकणी-मराठी गाणी आणि नृत्याचा कार्यक्रम पाहायला मिळतो. आपणाला यात सहभागी करून घेतात. मांडवी नदीतून रात्री केला जाणारा हा फेरफटका मनाला भुरळ घालतो. नदीत दिसणारी मोठ-मोठी कॅसीनो हॉटेल्सही आपल्याला दिसतात.

 रात्री 8.30 ला पुन्हा कळंगुटला टूर बसने सोडले. तेथून पुन्हा कळंगुट बिचवर जेवणासाठी गेलो. येथे बाजारपेठ छान आहे. पण पुण्यातील तुळशीबागेत जे मिळते. ते इथेही मिळते. त्यामुळे खरेदीचा मोह टाळला. किरकोळ खरेदी करून हॉटेलवर परतलो.

दुस:या दिवशी संध्याकाळी 7.30 ला पुण्याला जाणारी आमची नीता ट्रॅव्हल्सची बस होती. कळंगुटला पोहचल्यानंतर पुण्याला परतीसाठी प्रथम बुकिंग केले. न जाणो गाडीच मिळाली नाही तर. पणजीतून मापस्याला नीता ट्रॅव्हल्सची बस येणार होती. दुपारी 12.30 ला कळंगुट सोडले. तेथून मापश्याला आलो. 


अंजुना बिच

मापश्याहून अंजुना बिच बघायला गेलो. किरकोळ दर असल्याने बसमध्ये बसून सुमारे अर्धा तासाने बिचवर पोहचलो. गाडी दुस:या मार्गाने जाणार असल्याने त्या महाभागाने वाटेत सोडले मग सुरू झाला 1.5 किलोमीटरचा पायी प्रवास. पाठीवर भलीमोठी बॅग. अध्र्या तासाने घामाघुम होऊन एका हॉटेलमध्ये जेवण उरकले. तेथून अंजुना बिच पाहायला गेलो. हा सुद्धा छान बिच आहे. विशेष करून बाहेरील देशातील बहुसंख्य पर्यटक येथे उन खाण्यासाठी येतात. आम्ही गेलो तेव्हा तसे काही नव्हते. तेथून परत मापश्याला गाडीने आलो. मापसा :

मापसा येथे मोठी बाजारपेठ असून, तेथे काजू विक्री मोठय़ा प्रमाणावर होते. आम्ही गेलो तेव्हा गावाचा बाजार असल्याने गावागावातून आलेले ग्राहक व पर्यटकांमुळे येथे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पुण्यातील स्वारगेटप्रमाणो या ठिकाणांहून बाहेर जाणा:या म्हणजे पुणो, मुंबईकडे जाणा:या बसेस येतात. काजू, बदाम, वेगवेगळय़ा भाज्या, कपडे, कधीही न बिघतलेल्या भाज्या पाहण्यात चांगलाच वेळ गेला. तेथून बसची वाट पाहण्यासाठी थांबलो. सायंकाळी 7.45 ला गाडी आली. तोर्पयत गाडी येते का नाही याची भीती वाटत होती. नाहीतर पुन्हा काळंगटला परत यावे लागणार होते. पणजीतून गाडी सुटते व मापसाला येते. येथून पुण्याला जाते. येथेही बुकिंग करता आले असते. बस स्लिपरकोच असल्याने कधी झोप लागली ते कळलेच नाही.

समुद्रकिना:यापासून ते चर्च, मंदिरे, श्रीमंतांचे कॅसीनो आदी येथे सर्व काही इथे पाहायला मिळते. समुद्रकिना:यावर पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटणारे परदेशी पाहुणो..भव्य-दिव्य आणि उत्कृष्ट कलाकुसर असणारी चर्च..मंदिरे..उंच नारळाची हिरवीगार झाडी..समुद्रतील छोटी मोठी गलबते.. पाहून गोवाला परत येण्याचा निश्चिय करून परतीचा मार्ग धरला. 

काही टिप्स :

1) गर्दीच्या वेळी गोव्याला मुक्काम करणो अवघड आहे. 

2) स्वत:ची गाडी असली तरी टुरिस्ट बस करणो केव्हाही परवडेल कारण गोव्यातील काही ठिकाणो बरीच लांब आहेत. तसेच अनोळखी रस्ते शोधत बसण्यापेक्षा पैसे देऊन प्रवासाचा आनंद लुटावा हेच बरे.
3) काही बिचेस जवळ जवळ आहेत. त्यामुळे कदंब ट्रान्सपोर्टची सोय उपलब्ध आहे. किरकोळ तिकीट असते.


21 comments:

Unknown said...

सुंदर photography मुळे भटकायला जाण्याचा विचार बळावतो. आणि मोकळं ढाकळं लेखन -टिप्स सकट- सगळ्या परिसराची मस्त अशी सैर घरबसल्या घडवतं.. !

नितीन G said...

खुपच छान

नितीन G said...

खुपच छान

Mangesh said...

नागेश, म्हाळसा, कामाक्षी , महालक्ष्मी बद्दल माहिती द्यायला हवी होती.

Mangesh said...

नागेश, म्हाळसा, कामाक्षी , महालक्ष्मी बद्दल माहिती द्यायला हवी होती.

Unknown said...

टुरिस्ट बस कोठूनही मिळेल का फक्त पणजीतुनच

Unknown said...

टुरिस्ट बस कोठूनही मिळेल का फक्त पणजीतुनच

ferfatka said...

हो. नक्कीच. गोव्यातून सकाळी ८ किंवा ९ वाजता प्रत्येक हॉटेल्सच्या बाहेर या टुरिस्ट बसेस पर्यटकांना घेऊन जातात. व परत रात्री आणून सोडतात. फक्त ज्या हॉटेलमध्ये आपण थांबल त्यांना चौकशी करून तसे बुकिंग करण्यास सांगाल. अंदाजे प्रत्येक व्यक्तीला २५० रुपयांचे एक दिवसांचे टूर पॅकेज असते.

धन्यवाद

Unknown said...

हॉटेल चे दर संगितले असते तर बरे जाहले असते

Anonymous said...

हे तर टिपिकल गोवा.
नॉट रिअल

Unknown said...

मडगाव येथे राहण्यास योग्य आहे का?

आनंद बनसोडे said...

मित्रा, माहिती, ब्लॉग रचना सुंदर आहे. राहण्याची ठिकाणे, भाडे व फोन नंबर दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल.

Unknown said...

छान माहीती मिलली

Unknown said...

V good information thanks

Unknown said...

छान माहिती

Unknown said...

Wow Kiti chan

Unknown said...

Mast Mahiti

Unknown said...

Name - Ramdas Balasaheb Landage.
Swami'Chincholi.
Bhigvan.
8766815599.
8956560689.
Khoop Chaan

Unknown said...

Changli mahiti milali.
Aaple Dhanyawad!

Unknown said...

Khupach chan

Unknown said...

Ek number

कॉपी करू नका