Sunday, August 5, 2012

महड-पाली-उन्हरे-अलिबाग

महड-पाली-उन्हेरे-आलिबाग

श्री वरदविनायक गणपती

 

अष्टविनायकांपैकी सातवा असलेला हा महडचा श्री वरदविनायक गणपती महड, ता. रायगड जिल्हय़ात आहे. रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात हा गणपती आहे.  जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर खोपोलीकडून मुंबईकडे जात असताना 3 किलोमीटरवर डाव्या हाताला या मंदिराचा रस्ता लागतो. अष्टविनायकांपैकी असून सुद्धा येथील रस्ताची दुर्दशाच आहे. साधारणपणो दीड किलोमीटर रस्ता खराब आहे. मंदिरापासून काही अंतरावर गाडी पार्किगसाठी जागा आहे.
या मंदिरात सध्या नवीन बांधकाम होत आहे. मंदिराचा गाभारा मात्र पेशवेकालिन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातन काळाचा असल्याचे सांगितले जाते. गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना येथील तलावात 1690 साली सापडली. 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही उभारले. देवाळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत.
.

पाली (जि. रायगड)

बल्लाळेश्वर


श्रीबल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात कर्जतपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून 115 कि. मी. अंतरावर आहे. महडच्या मंदिरासमोरून पालीच्या गणपतीला जाता येते. महड पाली रस्ता 30 किलोमीटरचा असून, रस्ता खराब होता. सुमारे 1 तास लागतो. हा रस्ता हिरव्यागार गर्द, घनदाट झाडांनी वेढलेला आहे.
बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातील गणपतीचे देऊळ आहे. अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा हा गणपती ओळखला जातो. हा गणपती भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे.  चिमाजी अप्पा पेशवे यांनी येथील मंदिराला एक मोठी घंटा दिली आहे व येथील मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. येथील लाकडी मंदिराचे दगडी मंदिर तयार केले आहे.  मंदिराच्या बाहेर मोठय़ा आकारातील घंटा लावलेली आहे. अशीच घंटा वाईच्या मेणवली घाटावर सुद्धा आहे.मंदिराचा गाभारा पंधरा फूट उंच आहे . उंदराची मूर्ती हातात मोदक घेऊन उभी आहे . मूर्ती छान आहे. सभामंडप चाळीस फूट लांब आहे . देवळासमोर दोन मोठी तळी आहेत. परंतु नेहमीसारखे या ठिकाणही महाराष्ट्र पर्यटन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने दुरवस्था झाली आहे.  माघ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो.
सरसगड 

अगदी देवळाच्या जवळच सरसगड आहे. गडावर पूर्वी गेलो होतो. गडावर जाण्यासाठी मोठ मोठय़ा पाय:या आहेत. पालीगावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे. पाली गावातून इथं येउन किल्ला पहाणे 2-3 तासांत होते. या किल्ल्याच्या पूर्वेला 10 ते 12 कि.मी. वर सुधागड हा किल्ला आहे. धनगड, कोरीगड, तेलबैल्या, खंडाळा घाट, नागफणी, अंबा नदी, गरम पाण्याची कुंड असणारे उन्हेरे असा परिसर गडावरु न दिसतो. सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा नावांनी ओळखला जातो.

सरसगड येथील देवळात आणि परिसरात फोटो काढायला बंदी आहे. ही बंदी का असते हे कळत नाही. चौकशी केल्यास मंदिराच्या मागील बाजूस थोडय़ा अंतरावरच स्वच्छतागृह आहे. तेथे किरकोळ पैसे देऊन फ्रेश होता येते. मंदिर परिसरात मोठा तलाव आहे. नेहमीसारखी या ठिकाणी ही बाजार पेठ आहे. पोहय़ाचे पापड, मिरगुंड, कोकम सरबत, कुरडय़ा, लोणचे असे कोकणचे प्रकार घरी घेऊन येता येतात.

उन्हरे :

महाराष्ट्रातील गरम पाण्याचे कुंड म्हणून प्रसिद्ध. परंतु ब:याचश्या लोकांना माहित नसलेले उन्हरे हे गरम पाण्याचे कुंड पाली पासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. हा परिसर अंबा नदीच्या काठावर आहे.  श्रीरामाने बाण मारून सितामाईस स्नानासाठी हे स्थान तयार केले अशी पुराणात कथा आहे. या गंधकमिश्रीत कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार बरे होतात. असे बोलले जाते. एकुण तीन कुंडे आहेत. त्यापैकी एक महिलांसाठी एक पुरूषांसाठी आहे. या दोन्ही कुंडातील पाण्याचे तापमान त्वचेला सहन होते. तिस:या कुंडाचे पाणी जास्त गरम आहे. कुंडाच्या तळाशी लाकडाच्या फळय़ा आहेत. त्यावर उभे राहता येते.  येथे जास्त वेळ थांबल्यास गंधकाच्या वासामुळे चक्कर येवू शकते.  या ठिकाणी 15 फूट बाय 15 फूट असा गरम पाण्याचा कुंड आहे. कुंडाभोवती भिंत बांधलेली असून, या ठिकाणी बारा महिने, चोवीस तास गरम पाणी असते. पार्किग जागेजवळ छोटेसे हॉटेल सुद्धा आहे.
मागे एकदा मित्रंबरोबर घनगड - कोरीगड - तेलबैला - सवाष्णीचा घाटमार्गे पालीला आलो होतो. तेथून मुक्काम करण्यासाठी उन्हेरे ला एसटीने गेलो होतो. या ठिकाणी विठ्ठल-रु क्मिणी मंदिर असून, मंदिरात तेव्हा 1996 साली आम्ही मुक्काम केला होता. तेव्हा रात्री येथील वातावरणात गंधकाचा वास भरपूर होता. रात्री तर या कुंडातून मोठमोठे बुडबुडे येत असल्याचे पाहून मन काही काळ घाबारले होते. कारण लाव्हारसामुळे खडक तापतात. त्यात पाण्याचे झरे असल्यामुळे पाणी खडकातून वर येते. असे वाचले होते. न जाणो लाव्हारस बाहेर आला तर या भीतीने रात्र ब:यापैकी जागून काढली. येथून काहीच अंतरावर नदी असून, नदीतील पाणी मात्र नेहमी सारखे आहे.  रोहा मार्गे पालीच्या गणपतीला जाता येते. येथून पुढे जिंज:यालाही जाता येते.  उन्हरेतून नागोठणो मार्गे पेणला जाता येते. स्कूटरवरून परिवाराला घेऊन उन्हात निघालो. दुपारचे 2 वाजले होते. जंजि:याला जाण्याचा बेत रद्द करावा लागला. एकतर स्कूटर, वर उन मग काय हार मानून सरळ पेणला काकाकडे जायचे ठरले.  दुपारी 3.30 ला पेणला पोचलो. विश्रांती घेऊन पुन्हा संध्याकाळी अलिबागला बिचवर गेलो.

अलिबाग

 


 

या आधी अलिबागच्या कुलाबा किल्यावर गेलो असल्याने तसेच वेळही नसल्याने गेलो नाही. अलिबागला मुक्काम करायचा नाही असे ठरल्यावर टू व्हिलरवरून सायंकाळी 7 ला पेणला येण्यास निघालो. वाटेत छानच जंगल व घाटातून जाणारा रस्ता आहे. वाटेत गाडी पंक्चर होईल काय, चोर आडवेल काय अशी भीती वाटत होती. पण देवाच्या कृपेने तसे काही घडले नाही.  

अलिबाग एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. बिचवर नेहमी प्रवाशांची वर्दळ असते. अलिबाग विषयी पुन्हा एक वेगळा लेख नंतर लिहतो.महड गणपतीला जाण्यासाठी :

  • मुंबई-पनवेल-खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलिकडे 6 कि.मी. अंतरावर उजवीकडे महडसाठी रस्ता जातो. मुंबई-महड अंतर 83 कि.मी आहे.
  • मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जतपासून महड 24 कि.मी. आहे.
  • पुणे-लोणावळा-खोपोली-महड : अंदाजे 84 किमी. आहे.
  •  महडपासून सु. 20  किमी. अंतरावर कर्जत व खंडाळा ही लोहमार्ग स्थानके आहेत.

बल्लाळेश्वर पालीला जाण्याचा मार्ग

  • मुंबई ते पाली थेट एस.टी. ची आहे.
  • जवळचे रेल्वे स्टेशन कर्जत.
  • मुंबईहून रेल्वेने कर्जतला येथून पाली जाण्यासाठी एस.टी.बस आहेत.
  • खोपोली, पनवेल व कर्जत येथूनही एस.टी.ने पालीला जाता येते.
  • पुणे ते पाली बसची सोय आहे.
  • पुणे येथून रेल्वेने कर्जतला येऊन पुढे एस.टी. बसने पालीला जाता येते.

कॉपी करू नका