Saturday, June 11, 2011

चिपळूण-विध्यंवासिनी-हेदवी-गुहागर-व्याडेश्वर

करंजेश्वरी देवी

करंजेश्वरी मंदिरातील सजावट.


कंरजेश्वरी देवी.

गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का.

धक्यावरून दिसणारा परिसर. परशूराम मंदिर येथून दिसते.


चिपळूण हे मुंबई-गोवा हायवेवरील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. चिपळुणला परशुरामाचे पुरातन काळी बांधलेले मंदिर आहे. निसर्गरम्य कोकणात भगवान परशुरामांच्या भूमीत वाशिष्ठी नदीच्या तिरी गोविंदगडाच्या पायथ्याशी गोवळकोट येथे श्री देव सोमेश्वर व देवी करंजेश्वरीचे भव्य मंदिर आहे. अनेक कोकणस्थ लोकांची कुलस्वामिनी म्हणून करंजेश्वरी देवी प्रसिद्ध आहे. .चिपळूण पासून जवळ सुमारे 4 किलोमीटरवर असलेल्या गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याशी हिचे मुख्य स्थान असून मंदिर अतिशय सुंदर व निसर्ग रम्य परिसरात आहे . गोवळकोट किल्ल्यामध्ये रेडजाई देवीचे स्थान आहे. देवीच्या समोर सोमेश्वर महादेवाचे स्थान आहे. पटवर्धन, दीक्षित आडनावाच्या लोकांची ही कुलदेवता आहे. तर गुहागर येथील व्याडेश्वर कुलदैवत आहे.

कथा : करंजेश्वरीचा शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठी गर्दी असते. जागृत व पवित्न देवस्थान म्हणजे श्री देवी करंजेश्वरी. शहरातील पेठमाप गोवळकोट भागातील ग्रामस्थांचे हे ग्रामदैवत आहे. पूर्वीच्या काळी एका करंजीच्या झुडपात ही देवी प्रकट झाली. म्हणून तिला करंजेश्वरी असे नाव पडले. ती ज्या झुडपात प्रकाट झाली, तेथील जागेला शिंगासन असे म्हटले जाते. प्रकट झाल्यानंतर देवीने एका कुमारिकेला हळद-कुंकू आणण्यास सांगितले. कुमारिका हळदी-कुंकू आणण्यास गेल्यानंतर देवी अदृश्य झाली. ती पुन्हा गोवळकोट येथे प्रकट झाली. नंतर एका भक्ताच्या स्वप्नात येऊन तिने सांगितले की, करंजीच्या झुडपात नाकातील मोती अडकला आहे. तो घेऊन या. त्यानुसार तेथे मोती सापडला. ही घटना 300 ते 350 वर्षांपूर्वीची आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे या देवीचे कुलभक्त आजही करंजीचे तेल वापरत नाहीत.
किल्ल्यात सध्या वस्ती नाही. सागराकडून येणारा व्यापारी मार्ग या खाडीतून येत असल्याने चिपळूणला बंदर म्हणूनही महत्त्व प्राप्त झालेले होते. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी खाडीच्या मुखावर अंजनवेलचा गोपाळगड तर खाडीच्या आतील भागात चिपळूणचा गोवळकोट हा किल्ला उभारला गेला. गोवळकोट खाली बहुतांश मुस्लिम  वस्ती  आहे. उत्सवात सोमेश्वर व करंजेश्वरीच्या पालख्या मशिदीजवळ जातात. तेथे मुस्लिम समाजातील मानक:यांच्या हस्ते देवीची पूजा केली जाते. त्यानंतर होळी लावली जाते. पालखी गोविंदगडावर रेडजाई देवीच्या भेटीसाठी जाते. तेथे जगताप यांच्या हस्ते देवीची पूजा होते. हजारो महिला खणा-नारळाने देवीची ओटी भरतात आणि नवास बोलतात. नवसाला पावणारी देवी असा करंजेश्वरीचा लौकिक आहे. येथे राहण्याची सोय आहे. फक्त नवरात्रत जागा उपलब्ध आहे की नाही याची चौकशी करूनच मुक्कामाला जायला हवे. शक्यतो नवरात्रत जागा मिळणो कठीण असते.

कालभैरव व श्रीदेवी जोगेश्वरी :

श्री. देव जुना कालभैरव व श्रीदेवी जोगेश्वरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुप्रसिध्द ग्रामदैवत जागृत श्री जुना कालभैरव व श्रीदेवी जोगेश्वरीचे पुरातन मंदिर वसले आहे. हे देवस्थान श्रीक्षेत्र परशुरामांशी संबंधित आहे. 

विध्यंवासिनी  :

मुंबई-गोवा हायवेवर चिपळूण सोडल्यानंतर सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर डाव्या गोव्याकडे जाताना डाव्या हाताला विध्यंवासिनी मंदिराकडे जाणारा फाटा लागतो. श्री देवी विध्यंवासिनी रावतळे येथील डोंगरात 

विध्यंवासिनी मंदिर.

विध्यंवासिनी

विध्यवासिनी मंदिरा शेजारी कोयना जलविद्युत केंद्राची भुकंप शाळा


 श्री देवी विंध्यवासिनीचे पुरातन जागृत देवस्थान आहे. भारतातील बारा शिक्तपीठांपैकी विंध्यवासिनीचे मुख्यपीठ उत्तरप्रदेशात विंध्याचल येथे आहे. वसुदेव देवकीचे अपत्य समजून तिला कंसाने शिळेवर आपटण्यासाठी उचलले त्याचक्षणी ती कंसाच्या हातातून निसटून अंतराळात गेली आणि विंध्याचल येथे प्रकटली. तीच विंध्यवासिनी देवी होय. अशी येथे माहिती आहे. मंदिराच्या पाय:या चढून जाण्याच्या आधी डावीकडे अगिस्त कुंड लागते. यात बारमाही पाणी असत. मंदिरा शेजारी कोयना जलविद्युत केंद्राची भुकंप शाळा आहे. मंदिराच्या शेजारील मोठे धबधबे आहेत. मंदिरात नवरात्नौत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा दर मंगळवार, शुक्र वार गर्दी असते. ¨जोशी यांची ही देवी आहे. शेजारी मोठा पाण्याचा कुंड असून, मागील डोंगरामधून मोठा धबधबा कोसळतो. त्याचे पाणी कुंडात येते.  

व्याडेश्वर

चित्पावन ब्राह्मण घराण्यांमध्ये जास्तीत जास्त घराण्यांचे कुलदैवत हे गुहागर येथील समुद्रतीरी श्री क्षेत्र व्याडेश्वर होय. व्याडेश्वरला शंकराचे मंदिर आहे.  गुहागर गावामध्ये बस स्टॅंडचे जवळच हे मंदिर आहे. 


 देवळाभोवती प्रशस्त व स्वच्छ जागा आहे. येथे निवासाची सोय  आहे.  या मंदिराचे वार्षिक उत्सव हे त्रिपूरी पौर्णिमा व महाशिवरात्र आहे. मंदिराच्या मागे पाच मिनिटांवर समुद्रकिनारा असून नारळी पोफळीच्या बागा आहेत.

गुहागर

गुहागर समुद्रकिनारा

गुहागर समुद्रकिनारा
चिपळूणपासून 45 किलोमीटर गुहागरचा समुद्रकिनारा आहे. शेजारीच 5 मिनिटांच्या अंतरावर व्याडेश्वराचे मंदिर आहे. समुद्रकिनारा मोठा व स्वच्छ आहे.

श्री दशभुज लक्ष्मीगणोश - हेदवी

    गुहागर पासून 25 किलोमीटर अंतरावर हेदवी हे गाव आहे. तटबंदीने वेढलेले थोड्या उंचीवरील  मंदिर वर चढून जाण्यासाठी पाय:या आहेत.  पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे गणोशभक्त राहत होते. त्यांची पुण्याला पेशव्यांशी भेट झाली असता त्यांना वर्तवलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे 


हेदवी मंदिरातील गणोशमूर्ती.
 पेशव्यांनी त्यांना त्या काळी मंदिर बांधण्यासाठी पैसे दिले. त्या पैशातून हे मंदिर उभारले. गणपतीची मूर्ती काश्मीर मधील पाषाणापासून बनवलेली आहे. दहा हातांची ही मूर्ती आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहत आहे असे वाटते.मंदिर आवारातच दीपमाळही आहे  मंदिर परिसरात असलेली गर्द आंब्याची झाडे आहेत.  दर संकष्टी व विनायक चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते. हेदवी गावाजवळ स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा आहे. श्री उमा महेश्वर मंदिर  हेदवीच्या समुद्रकिनारी डोंगराच्या पायथ्याशी उमा महेश्वराचे मंदिर आहे. अहल्याबाई होळकरांनी दिलेल्या देणगीतून हे मंदिर उभारल्याचे सांगितले जाते. समुद्रकिनारी खडकाळ भागात थोड्या उंचीवर असलेल्या या मंदिरापर्यंत भरतीचे पाणी येते. गाभा:यात एक शंकराची पिंड असून मंदिराजवळच एक पाण्याचे कुंडदेखील आहे.
हेदवी मंदिर परिसरहेदवी मंदिरहेदवी मंदिर परिसर

बामणघळ

बामणघळ हेदवीचा किनारा हा स्वच्छ असून सुरिक्षत आहे. उमा महेश्वर मंदिराच्या बाजुने डोंगराच्याकडेने चालत गेल्यास पुढे खडकात पडलेली एक मोठी भेग दिसते. भरतीच्या वेळेस येथे उंच लाट उसळते. डोंगरावर समुद्राचे पाणी आदळून एक अरुद घळ तयार झाले आहे. पाण्याच्या अंदाज येत नाही त्यामुळे जरा सावध राहायला हवे.

जायचे कसे


- पुणो - ताम्हिणी घाट मार्गे - वेळे - निजामपूर - माणगाव- महाड- पोलादपूर- खेड- चिपळूण
- वरंधा घाट मार्गे- पुणो - सातारा रोडने  कापूरव्होळ - भोर/ वरंधा घाट महाड - पोलादपूर- खेड- चिपळूण 
- महाबळेश्वर घाट  मार्गे- पुणो - सातारा रोडने  खंबाटकी घाट ओलांडल्यानंतर वाई फाटा- वाई- पाचगणी - 
- महाबळेश्वर - पोलादपूर- खेड- चिपळूण 
- उंब्रज मार्गे पाटण- कोयनानगर- चिपळूण (चांगला मार्ग आहे.)

 कॅमेरा नसल्या कारणाने काही ठिकाणचे फोटो काढण्याचे राहुन गेले. पुढील भेटीत नक्की फोटो जोडतो.

खालील चिपळुण नगरपालिकेची लिंक पहा.

http://www.cmcchiplun.org

कॉपी करू नका