Saturday, May 19, 2012

कोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे

कोयना डॅम  - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे

चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्याने 6.15 ला निमगाव केतकी सोडले. संत ज्ञानेश्वर पालखी मार्गे नातेपुते शिखर ¨शगणापूरला गेलो. रस्ताच्या बाजुबाजूला ओसाड रान आहे. तर काही ठिकाणी उसाची शेती केल्याचे दिसून आले. उन्हाळा असल्याने ब:यापैकी गरम होत होते.

गोंदवलेकर महाराज

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिर पाहिले. भक्तांतर्फे  येथे मोफत प्रसाद वाटप केला जातो. यासाठी आजुबाजूच्या गावातून तसेच अन्य ठिकाणांहून भाजीपाला, गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये तसेच तेल टेम्पोच्या टेम्पो भरून मोफत वाटले जातात. या ठिकाणी दुपारी 12.30 वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाते. वेळ नसल्याने आम्ही तेथून निघालो. हे ठिकाण सातारा पंढरपूर रस्त्यापासून सुमारे 64 किलोमीटरवर आहे. तेथून आम्ही 9 ला निघालो. नवीन मार्ग व नकाशा जवळ नसल्याने नक्की कोठून आलो ते कळले नाही. मात्र, येथे येण्यासाठी रोटीबोटीचा घाट लागला. वाटेत एका ठिकाणी थांबून काकूंनी घेतलेला उपमा पोटभरून खाल्यावर पुढे निघालो. वाटेत एका बागेत कै:या तोडण्याचा कार्यक्रम केला. तेथून उंब्रजफाटय़ाला आलो. एव्हाना 10.30 वाजले होते.


कोयना धरण
 
कोयना धरण परिसर पाहण्यासाठी निघालो. कुंभार्ली घाटाच्या खूप अलिकडे  कोयना धरणाकडे रस्ता आहे. रस्ता चांगला बांधला आहे. कोयना धरणाच्या पाण्यावर फुलविलेली मोठी बाग पाहिली. बागेत जाण्यासाठी 10 रुपये प्रवेश फी तर पार्किग 20 रुपये  आहे. बाग सुंदर असून, बागेतून धरण परिसर छान दिसतो.  तेथून कुंभाली घाटातून चिपळूणला जायला निघालो. उन्हाळय़ाचे दिवस असल्याने वाटेत दोन मोठे फणस विकत घेतले. मात्र, मुक्कामी गेल्यावर खराब असल्याचे कळले असो.  कुंभार्ली घाटातून चिपळूणला गेलो. वाटेत जाताना वाटते संगमेश्वर संभाजीमहाराजांना जेथे पकडले ते ठिकाण आहे. बरीच नावे अशी असल्याने पाहायचे राहून गेले. 

डेरवण : 

 
 

डेरवणला शिवसृष्टीचे शिल्प पाहण्यासाठी गेलो. चिपळूण डेरवण सावर्डमार्गे 2क् किमी अंतरावर आहे. श्रीसंत सीताराम बुवा आत्माराम वालावलकर यांचे डेरवण गावात वास्तव्य होते. त्यांच्या निकटविर्तयांनी श्री संत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. दि. 5 मे 1981 रोजी श्री महाराजांनी शिवजयंतीच्या दिनी श्री शिवसमर्थ मंदिराचे उद्घाटन केले. कै. गणेश दादा पाटकर व सहका:यांनी पंधरा वर्षे अथक मेहनतीतून शिवशिल्पसृष्टी साकारली आहे. गडाच्या दरवाज्यासमोर दोन हत्ती आहेत. तटबंदीतून प्रवेश केल्यावर प्रथम दोन मावळे पहारा करताना दिसतात. स्वराज्याची शपथ, अफझलखान वध, बाजीप्रभू देशपांडे, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग येथे मूर्तीच्या स्वरूपात आहेत. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. या ठिकाणी फोटो काढण्यास बंदी आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी अश्वारूढ झालेले मावळे आपले लक्ष वेधून घेतात. सुमारे 150 ते 200 मावळे या ठिकाणी आहेत.  एव्हाना दुपारचे 2 वाजले होते. दुपारचे जेवण येथेच ओटापले.
नंतर कळालेली माहिती  - (डेरवणला शिवशिल्पसृष्टीपासून सुमारे दीड किमी अंतरावर एक मोठा राजवाडा आहे. राजेशिर्के यांचे वंशज येथे राहत असल्याचे समजले.)

मार्लेश्वर  : 

  

मार्लेश्वर जायला निघालो. मार्लेश्वरला जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जातो. वेडीवाकडी वळणो घेत. 3 ला मार्लेश्वरला पोहचलो. मार्लेश्वरला शंकराचे मंदिर आहे. मंदिराला जाण्यासाठी अंदाजे 250 ते 300 पाय:या चढून जावे लागतात. पावसाळय़ात या ठिकाणी खरे जायला हवे. समोरून 500 ते 1000 फुटांवरून धबधबा कोसळत असतो. आम्ही गेलो तेव्हा धबधबा ज्या ठिकाणावरून कोसळतो त्या ठिकाणी फक्त पाण्याची बारीक  धार  दिसून येत होती.  सुमारे 3क् ते 35 मिनिटे चालण्यास लागतात. वाटेत पाय:या केल्यामुळे धमछाक चांगलीच होते. वरती शंकराच्या मंदिरात सापाचे दर्शन घडते असे म्हणतात. मंदिराभोवती माकडे भरपूर असल्याने चांगला वेळ गेला. मार्लेश्वरहून सायंकाळी  5 ला निघालो. एव्हाना गाडी लागल्यामुळे अनेक जागा बदल केले. शेवटी मलाही गाडी लागल्याने चांगलेच चक्करायला लागले. सायंकाळी 8. ला गाडी  गणपतीपुळे येथे आली. मुंबई-गोवा महामार्गावरील हातखांबा येथून र}ागिरीमार्गे गणपतीपुळेला जायला सुमारे 40 कि.मी.चा मार्ग आहे.

गणपतीपुळे


 

मग आला मुक्काम करण्याचा प्रश्न. काकांबरोबर गणपतीपुळेत आठ माणसांसाठी राहण्यास जागा मिळते का ते पाहायला गेलो. बराच ठिकाणी हुडकल्यावर एसटी स्टॅन्ड शेजारी दीक्षित यांचा हॉल मिळतो का ते पहा असे एका माणसाने सांगितले. त्यांचा फोन घेऊन त्यांना फोन केला. या म्हणाले. जागा म्हणजे मस्त पैकी एक मोठा हॉल होतो. मस्त सोय झाली. फॅमिली म्हणून एकूण 7क्क् रुपये त्यांनी घेतले. हॉलमध्ये सामान ठेऊन फ्रेश होण्यास गेलो. एव्हाना 9.30 वाजले होते. दिवसभर गाडीत बसून अंग चांगलेच चिंबून आले होते. 9.3क् जेवणासाठी म्हणून मालगुंडला एक चांगले हॉटेल असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. तेथून मालगुंड दोन किलोमीटरवर होते. पुन्हा गाडीत बसून मालगुंडला गेलो तर तेथे जागा नसल्याचा बोर्ड पहायला मिळाला. निराश होऊन पुन्हा गणपतीपुळेमध्ये पोटाबासाठी हॉटेल शोधायला निघालो. अखेर एका ठिकाणी कशीबशी जागा मिळाली. जेवण बेताचेच होते. परंतु चालले. रात्री 10.30 जेवण संपवून पुन्हा हॉलमध्ये आलो. गप्पाटप्पा करून सगळे झोपलो. आमच्याबरोबर आणखीन एक कुटुंब हॉलमध्ये राहायला आले होते. तेवढीच सोबत मिळाली.

मालगुंड

दुस:या दिवशी सकाळी 6 ला उठून 9 वाजेर्पयत सगळे मालगुंडला कविवर्य केशवसूतांचा वाडा पाहण्यासाठी गेलो. टिपकल कोकणी वाडा कसा असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा वाडा. शेणाने सरावलेली जमीन, बाहेर लाकडी झोका, आतमध्ये गाई, गुरांसाठी बांधलेला गोठा, केशवसूत जन्मलेली खोली, तेथील पलंग, पाळणा तसेच शेजारील खोलीत महाराष्ट्रातील दिग्गज कवींनी रचलेल्या कविता, लेखक व त्यांचे फोटो असे संग्राहालय पाहिले. एकूणच मलगुंडच परिसर शांत व नारळी, फोफळीच्या बागांनी सजलेला दिसला.  तेथे समुद्रकिनारा पाहिला. समुद्रकिना:यावर अर्धा तास खेळून पुन्हा निघालो
गणपतीपुळेला गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. तेथे गेलो तर ही भली मोठी रांग बहुदा एकादशी होती. त्यामुळे तब्बल दीड तास रांगेत उभे राहून गणरायाचे दर्शन घेतले. मंदिर छान आहे.  प्राचीन कलाकुसरीतील मंदिर व मूर्र्ती सुंदर आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ पिक्चरमध्ये येथील शुटिंग आहे. वॉटर स्कूटर, मोटर, पॅडल बोट, बोटिंग या सुविधा एमटीडीसीने येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. मंदिराशेजारील समुद्रकिना:यावर थोडा वेळ थांबून पोटाबा करण्यासाठी हॉटेल गाठले. एव्हाना दुपारचा 1 वाजला होता. तेथेच एका झाडावरून आंबे उतरवित होते. त्यातील एकाला गपचूप 50 रुपये दिले. त्याने पण खूश होऊन 1क् कै:या दिल्या. क:या कशाला देताय म्हटल्यावर तो म्हणाला,‘‘घरी घेऊनच जा मस्त पिकतील. आणि खरच घरी आल्यावर आठवडय़ात मस्त हापूस आंबा आणि तोही 50 रुपयांत. राईसप्लेट (शाकाहारी) खाऊन पावसाला जाण्यासाठी निघालो. येथील एकूणच सर्व जागा या नारळ, हापूस आंब्यांच्या बागांनी  सजलेले.

गणपतीचे दर्शन घेऊन पावसला निघालो. रत्नागिरीला कोतवडे मार्गे आलो.  नाणंजमार्गे जायचे नाही. अंतर 12 ते 15 किलोमीटरने वाढते. येथे आल्यावर दोन बंदर पाहिले.

भोगावती बंदर

एक भोगावती बंदर व दुसरे मार्गो बंदर येथे जवळच किल्ला आहे. पण वेळ नव्हता. येथे एका ठिकाणी समुद्राचे पाणी तापकीरी रंगाचे तर दुस:या ठिकाणी काळय़ा रंगाचे दिसले. मातीचा परिणाम. छोटय़ा बोटी दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी येथे आलेल्या होत्या. दुपारचे 4 वाजले होते. अजून पावसला व तेथून लांजाला मामांकडे मुक्कामाला जायचे होते.

पावस :

 श्रीमत परमहंस सदगुरू स्वामी स्वरूपानंदमहाराजांचे येथे मंदिर आहे. मंदिर परिसर सुरेख असून, मंदिर मोठे आहे. येथे कमळाची फुले खूप लावलेली आहेत. वेळेअभावी पावस विषयी माहिती घेऊ शकलो नाही. या ठिकाणीही कोकणचा मेवा विकायला आलेला आपल्याला दिसतो. आंबे, कै:या, बोरं, फणस, फणस पोळी, आंबा पोळी, काजू,  असे विविध कोकणमेवा आपणाला भुलवतो. पावसला देसार्इ् बंधूची आंब्यांची झाडी पाहिली. एवढय़ा लांबून हे आंबे येतात हे पाहून आश्चर्य वाटले. पावसवरून निघाल्यावर सायंकाळी 6.3क् लांजा एसटी स्थानकाशेजारी पोहचलो. तेथून मामांना फोन करून बोलावून घेतले. तेही लगेच आले. मामाकडे सगळय़ांनी मुक्काम केला. त्यांचे घर लोकवस्तीपासून दूर. शांत ठिकाणी. मामांकडे त्यांनी लावलेली आंब्याची कलमे पाहिली. काजुची बाग दाखवली. ब:याच वर्षानी काजुची बी खाल्ली. थोडी तुरट, आंबट, गोड काय मस्त चव. वा. रात्री पोटभर जेवण करून. सकाळी पाहुणचार घेऊन निघालो. 9 वाजता त्यांचे घर सोडले
नंतर कळालेली माहिती : (लांजा - श्रीकालभैरव योगेश्वरी मंदिर, कोटचा सिध्दीविनायक, वनसुळे, एकखांबी गणपती मंदिर, मिल्लकार्जुन आदी मंदिर येथे आहेत.)
.

नाणिज मंदिर

 

 

दुस:या दिवशी नाणजला जायचे असल्याचे काकांनी सांगितले. स्वामी नरेंद्र महाराज यांचे जन्मस्थान असलेले नाणीज हे गाव. नाणिजधाम म्हणून प्रसिद्ध आहे. नाणिजला तर अखंड डोंगरावर मंदिर पाहून आश्चर्यचकितच व्हायला होते. अतिशय प्रशस्त जागा, सुंदर हिरवळ, मोठमोठी मंदिरे, सर्वत्र टापटिप. येथे गोरगोरिबांसाठी मोफत रुग्णसेवाही उपलब्ध आहे. मंदिराचा आकार संपूर्ण रथाचा केला असून, हा रथ दोन हत्ती ओढत असल्याच्या मोठय़ा आकारातील 15 या ठिकाणी आहेत. रथाची चाके सुद्धा चांगलीच मोठी आहे. संपूर्ण मंदिरातील आतील काम कोरीव लाकडात आहे. मंदिर परिसरात फोटो काढण्यास बंदी आहे. मंदिराशेजारी विश्व व काही पौराणिक देखावे आहेत. मंदिर पाहण्यास दीड तास लागतो. तेथून पुढे मार्लेश्वरला फाटा आहे. कोल्हापूरला 12क् किलोमीटर राहते. अंबा घाटमार्गे कोल्हापूरला जाण्यासाठी निघालो. देशावर व घाटाखाली जमिन, माती, दगड रंग बदलतात जातात. हे येथे दिसते.

जोतिबाचा डोंगर

अंबा घाटातून कोल्हापूरकडे जाताना वाटेत 21 किलोमीटरवर जोतिबाचा डोंगर लागतो. श्री ज्योतिबाच्या दर्शनाला गेलो. चैत्र महिन्यात ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात होते.  रविवारी व प्रत्येक पौर्णिमेला भक्तगण देवदर्शनासाठी गर्दी करतात.  सुमारे पाच हजार लोकवस्ती असणा:या या डोंगरावर बहुतांशी गुरव समाजातील लोक राहतात. दक्षिणा व शिधा हेच त्यांचे उत्पन्न आहे.  ज्योतिबाला सकाळी 8  ते 9  या वेळेत अभिषेक केला जातो. दुपारी 12 व रात्नी 9 वाजता ज्योतिबाची आरती होते. मंदिर रात्नी 11 पर्यंत दर्शनासाठी खुले असते.  आम्ही गेलो तेव्हा रविवार असल्यामुळे चांगलीच गर्दी होती. दर्शन न घेताच परत निघालो. वर्पयत गाडी जाते. काहीच अंतर चालवे लागते. डोंगरावर चांगलेच उन लागत होते. वारणा लस्सी पिऊन जोतिबाचा डोंगर सोडला.
कोल्हापूरला 11 ला पोचलो. गाडी पार्किग करायला तब्बल अर्धा तास गेला. महालक्ष्मीचे मंदिर मोठे आहे. रांगा सुद्धा चांगलीच मोठी होती. 1 तासानंतर देवीचे दर्शन घेतले. फक्त 10 ते 15 सेकंदात पुढे ढकले की झाले दर्शन. कोल्हापूरच्या देवीचे दर्शन घेऊन कोल्हापूरची बाजारपेठ हिंडलो. संध्यकाळी 5 ला कोल्हापूर सोडले. रात्री 9 ला घरी आलो.

 

कॉपी करू नका