Sunday, August 11, 2013

रायगड - लोहरज्जू मार्गेरायगडवर एक रस्ता १४०० पायºयांनी गडावर जातो. तर दुसरा रस्ता रोपवे कडे हिरकणीगावातून जातो.  १५ - २० वर्षांपूर्वी सुमारे १४०० पायºया चढून या किल्यावर जावे लागे. आता मात्र रोपवे सेवा सुरु झाली आहे. अवघ्या ५ मिनिटांत रायगडवर पोहचता येते. १५ वर्षांपूर्वी मी एका ट्रेकिंग क्लबबरोबर येथे पानशेत ते रायगड असा ट्रेक केला होता. मजा आली होती. दिवसभर चालून चालून पाय चांगले दमले होते. तीन दिवसाचा या ट्रेकमध्ये एक संपूर्ण दिवस  व एक रात्र रायगड पाहून झाला होता. रोलचा कॅमेरा असल्यामुळे जास्त फोटो काढता आला नाहीत. त्यानंतर आज बºयाच वर्षांनी रायगड किल्ल्यावर जाण्याचा आनंद काही औरच होता. आणि तेही रोपवे मधून.

रोप वे मार्गे रायगड :

४ फुट उंचीखालील लहान मुलांसाठी ११५ रुपये जाऊन येऊन. तर प्रौढ व्यक्तींसाठी १८० रुपये जाऊन येऊन तिकीट आहे. एका ट्रॉलीमध्ये ४ प्रौढ व २ लहान मुले बसतात. एका वेळी दोन ट्रॉली गडावर घेऊन जातात. त्याचवेळी वरून खाली दोन ट्रॉली गडावरून शिवभक्तांना घेऊन खाली येतात. गडावर जाण्यासाठी ट्रॉलीतून पाच मिनटं लागतात. चौकशी केली असता मे महिन्यात, शनिवारी व रविवारी, सुटटी दिवशी येथे गर्दी असते. दोन दोन तास थांबून वर गडावर जाण्याची वाट पहावी लागते. मी मात्र सुदैवी निघालो. शनिवार असूनही देखील पर्यटकांची गर्दी पाहिजे तेवढी नव्हती. तिकीट काढून रोपवे मध्ये बसलो. रोपवे सुरू झाला. ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत रायगडाकडे रोपवेची ट्रॉली निघाली. मराठीतून रोप वे ला ‘लोहरज्जू’ असे मजेशीर नाव आहे. वर जाण्याचा अनुभव लिहिणे शक्य नाही. यासाठी एकदा तरी प्रत्त्यक्ष अनुभव घ्यायला हवा. वर जाण्यासाठी पाच मिनिटेच लागतात. परंतु जो अनुभव आहे तो मोजता येणार नाही. जसे जसे किल्यावर पोहचत होतो तस तसे खालील लावलेली वाहने, माणसे, शेती छोटे छोटे होत गेले. छातीत चांगलीच धडधड वाढत होती.  लांबवर उंच डोंगर दिसू लागले होते.  ज्युरॅसिक पार्कमधील धबधबा व हॅलिकॉप्टरचे दृश्य आठवले. रायगडावरून कोसळणारा धबधब्या शेजारून आपण वर पोहचतो. एकदम मस्त वातावरण अनुभवयाला मिळाले.  वरती पोहोचोस्तोवर ढग दाटून आले. वर पोहाचलो ते दाट ढगामध्येच. अचानक खालील दृश्य गायब झाले. गडावर काही पायºया चढून जाऊन मेणा दरवाज्यातून गडावर जाता येते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० साली राजगडावरून रायगडावर राजधानी हलवली. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा १६७४ साली याच किल्यावर झाला. शिवाजी महाराजांचा मृत्यू १६८० मध्ये याच किल्यावर झाला. गडावर जगदीश्वराचे  मंदिर आहे. त्यासमोर समाधी व त्यांच्या वाघ्या या कुत्र्याचे स्मारकही आहे. हत्ती तलाव, गंगासागर तलाव, टकमक टोक, होलरचा माळ, हिरकणी बुरुज, मदरशाचे थडगे, नाना दरवाजा, महादरवाजा  या गोष्टी पहाण्यासारख्या आहेत. गडावर भोजनाची सोय आहे.
संपूर्ण गडावर मध्येच जोरात पाऊस व दाट धुक्यामुळे खालील परिसरत पाहणे शक्य नव्हते. मात्र, पाऊस संपता संपता गड पाहणे एक वेगळाच अनुभव होता. गड पाहून अडीचला रोप वे परत खाली आलो. खाली आल्यावर झुणका भाकरीवर ताव मारून पोटपूजा उरकली.
तेथून आम्हाला चिपळूणला करंजेश्वरी देवीचे दर्शन व मुक्कामाला जायचे होते.

(४ ते ५ ठिकाणे असल्यामुळे एकदम सर्व प्रवास वर्णन करणे शक्य नव्हते. फोटो सुद्धा बरेच काढले असल्यामुळे दोन वेगळे भाग करून प्रवास वर्णन करत आहे.  सध्या फक्त ताम्हिणी घाट व रायगड रोपेवे मधून रायगड हे वर्णन देत आहे. लवकरच श्री. करंजेश्वरी देवी, परशुराम मंदिर व श्री कर्णेश्वर याचा भाग लिहितो.)

भगवान श्री परशुराम मंदिर

हिरकणी गावातून रायगडावर दाट ढगातून जाणारा रोप वे.रोपवेतून जाण्यासाठीचे नियम व अटी

रोप वे स्टेशन.रायगडावरील एक दरवाजा
रायगडावरील बाजारपेठेतील एका दुकानाबाहेरी नक्षीकाम.
छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा.

 जगदिश्वराचे मंदिर.

लाडक्या वाघ्या कुत्र्याची समाधी.

छत्रपती शिवाजीमहाराजांचे समाधीस्थळ.
समाधीस्थळाशेजारील शिलालेख.


रायगडावर जाणारा रोपे वे मार्ग या मोठ्या धबधब्याशेजारून जातो.

रोपे वे चे यांत्रिकी जाळे

कसे जाल : 

  • मुंबई - गोवा महामार्गावरील महाड येथून २४ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. 
  • पुण्याकडून ताम्हिणी घाटातून उतरल्यावर एक रस्ता सरळ कोलाडगावाकडे जातो. तेथे न जाता  घाट उतरल्यावर डावीकडे निजापूरला जाणारा रस्ता आहे.  तेथून सुमारे २५ किलोमीटरवर रायगडला पाचाडमार्गे जाण्यासाठी रस्ता आहे. आम्ही या रस्त्याने गेलो. काही रस्ता घनदाट जंगलातून व निर्मुष्यवस्तीतून जातो. वाटेत धामणी, हरवंडी, खराबाचीवाडी आदी छोटे गावे लागतात. 
  • मुंबई - रायगड २१० कि. मी. (महाडमार्गे), 
  • पुणे - रायगड - १२६ कि. मी., 
  • महाड - रायगड - २७ कि. मी., 
  • पर्यटन महामंडळाची निवासस्थाने याशिवाय खाजगी हॉटेल उपलब्ध आहे.

1 comment:

Unknown said...

मस्त..मस्त..मस्त..

कॉपी करू नका