Monday, August 12, 2013

पाचाड दुर्गदुर्गेश्वर रायगड रस्ता

ताम्हिणी घाटातून खाली उतरलो. कोलाड गावाकडे जाणाºया रस्त्याकडे न जाता. निजामपूरकडे जाण्यासाठी रस्ता विचारला. एक रस्ता थेट महाडपर्यंत जातो. तेथून रायगडाकडे येता येते. दुसरा रस्ता ज्याने आम्ही गेलो तो पाचाड मार्गे होता. 

हा रस्ता काही प्रमाणात चांगला रस्ता आहे. परंतु दिवसाढवळ्या गेलेले बरे कारण काही रस्ता घनदाट जंगलातून व निर्मुष्यवस्तीतून जातो. वाटेत पंक्चरची दुकाने, पेट्रोलपंप मिळणार नाही. वाटेत धामणी, हरवंडी, खराबाचीवाडी आदी छोटे गावे लागतात. सुमारे २५ किलोमीटर अंतरासाठी आम्हाला पाचाडला पोहचण्यासाठी पाऊणतास लागला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी उभारलेली मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून रायगडाचे महत्त्व आहे. निजामपूर मार्गे पाचाडला पोहाचलो. जिजाबार्इंची समाधी या पाचाडला आहे. वृद्ध झाल्यामुळे जिजाबार्इंना गडावर येणे शक्य नव्हते. त्यामुळे महाराजांनी त्यांच्यासाठी खाली पाचाडला वाडा बांधून दिला. पाचाडला सध्या जिजाबार्इंची समाधी आहे. समाधीचे दर्शन घेऊन रायगडवर जाण्यासाठी निघालो.

रायगड

पाचाड - रायगड मार्गावरील खेड्यातील रस्त्याच्याकडेचे घर.

पाचाड - रायगड मार्गावरील खेडे.

पाचाड - रायगड मार्गावरील जंगलातून जाणारा रस्ता.डोंगरातून कोसणारा धबधबा.

पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधी उद्यान प्रवेशद्वार


राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची समाधीस्थळ.No comments:

कॉपी करू नका