Wednesday, May 1, 2013

सद्‌गुरू जंगली महाराज


सद्‌गुरू जंगली महाराज            सध्या जेएमरोड नावाने प्रसिद्ध असलेला हा रस्ता ज्यांच्या नावामुळे नावारुपास आला त्या श्री सद्‌गुरू  जंगलीमहाराजांचे येथे समाधीमंदिर आहे. अनेक भाविकांची या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. प्रवेशद्वारातून आपण प्रवेश केल्यावर काही मोजक्याच पायºया चढून आपण मंदिरासमोर येतो. मुख्य मंदिराबाहेर मोठी घंटा बांधण्यात आलेली आहे. मंदिरात महाराजांचा फोटो व समाधीस्थळ आहे. 
          
 महाराष्ट्राच्या संतमंडळात जंगली महाराज हे नाव प्रख्यात आहे. जंगली महाराज हे अगदी अलिकडच्या काळातील संत होऊन गेले. जंगली महाराज या नावावरुन ते कोणत्या धर्माचे वा कोणत्या पंथाचे होते, याची काहीच कल्पना येत नाही. त्यांचे हेच नाव रुढ झालं. विविध धर्माच्या आणि पंथांच्या लोकांना ते आपलेच वाटले. यातच त्यांचं खरं   संतत्व आहे. महाराजांचं वास्तव्य बराच काळ पुण्यातच होतं आणि त्यांचं बरंचसं कार्यही पुण्यातच झालं. जंगली महाराज हे मुस्लिम संत होते. त्यांचे मूळ नाव जंगली शहा. त्यांच्या शिष्यांमध्ये आणि भक्तांमध्ये अनेक जातीधर्मांचे लोक आहेत. 
           त्यांचं मूळगाव सोलापूर जवळील होनमूर्गी. हिंदू, इस्लाम आणि वीरशैव अशा वेगवेगळ्या धर्माचे लोक या गावात राहतात. गावाचं कुलदैवत बसवेश्वर आहे. जंगलीशहा हे बालपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. मराठी, कन्नड, उर्दू आणि फार्र्सी या भाषा त्यांना अवगत होत्या. हजरत शहा ताहेर कादरी सत्तारी हे त्यांचे मुस्लिम गुरु होते. अक्कलकोटच्या परिसरात महान धमर्गुरु म्हणून ते मानले जात. 
          
 ४ एप्रिल १८९० रोजी महाराजांची प्रकृती खालावली. भांबुर्ड्याच्या टेकडीवर (शिवाजीनगर) येथे समाधीची/कबरीची जागा त्यांनी निश्चित करुन ठेवली होती. जंगली महाराज मंदिरात हिंदू पद्धतीने पूजाअर्चा करीत होते. गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत संगीत महोत्सव होतो.  
           मंदिराशेजारून होणारी वाहनांची वर्दळ व गोंगाटाचा येथे आवाज सुद्धा येत नाही. मंदिरात गेल्यावर मन शांत व प्रसन्न होते. No comments:

कॉपी करू नका