Tuesday, February 25, 2014

श्री सिद्धिविनायक अर्थात श्रीक्षेत्र सिद्धटेक

अष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक गेल्या शनिवारी श्रींचे दर्शन घेऊन पुढे गावी गेलो. अशा या अष्टविनायक गणपतीची माहिती थोडक्यात.

 

 


               अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती म्हणजे श्री सिद्धिविनायक. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती. श्रीक्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर  आहे.  श्रीगोंदे तालुक्यात भीमा नदीकाठी दौंडच्या उत्तरेस सुमारे १९ किलोमीटरवर आहे.  अहल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिर उत्तराभिमुख असून  मंदिरापर्यंत पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी मार्ग बांधला आहे. बाहेरच्या बाजूस सभामंडप असून महाद्वार व त्यावर नगारखाना आहे.
            सिद्घिविनायकाची स्वयंभू पाषाणमूर्ती असून सोंड उजवीकडे आहे. मूर्ती तीन फुट रुंद आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत.  उजव्या-डाव्या बाजूंस जय-विजयांच्या मूर्ती आहेत. उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे हे कडक दैवत मानले जाते. श्री मोरया गोसावी यांनी येथेच साधना केली होती व नंतर ते मोरगावी गेले. मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची प्रथा आहे.  प्रदक्षिणेचा मार्ग खूप मोठा आहे. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते. सध्या या नदीवर पूल बांधल्यामुळे थेट नदी ओलांडून मंदिरापर्यंत येता येते. पूर्वी होडीतून नदीपार करावी लागत असे.  मंदिरा बाहेर अर्थातच धार्मिक साहित्य, फुले विक्रीची दुकाने थाटलेली याही ठिकाणी दिसून येतात. भाद्रपद आणि माघ महिन्यात येथे उत्सव होतात

 

कसे जाल :

  • यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर अंदाजे १९ कि.मी. आहे.
  • पुण्याच्या शिवाजीनगर एस.टी. स्थानकापासून दुपारी तीन वाजता थेट सिद्धटेकची बस आहे.
  • पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक अंदाजे १०० कि.मी. वर आहे. गजाननाच्या कृपेने रस्ता चांगला आहे. पुण्याहून निघून थेऊर, सिद्धटेक व रांजणगाव अशी गणपती यात्रा एक दिवसात होऊ शकते. अष्टविनायकातील अन्य गणपतींच्या स्थळांच्या माहितीसाठी क्लिक करा...

 हा फेरफटका आपणास कसा वाटला ते येथे जरूर लिहा...

No comments:

कॉपी करू नका