Monday, September 16, 2013

पुण्याचे वैभव : शनिवारवाडा (भाग २)


२. अलीबहादूर दरवाजा / मस्तानी दरवाजा :

 मस्तानी, समशेरबहादूर व मस्तानीचा नातू (आणि बांदा संस्थानाचा मूळपुरुष) अलीबहादूर हे ईशान्य कोपºयात राहत असत. ते वाड्याच्या ईशान्य बाजूच्या दरवाज्यातून ये-जा करत असत म्हणून त्या दरवाज्यास अलीबहादूर / मस्तानी दरवाजा असे नाव दिले गेले. दरवाजा सर्वात लहान आहे.

३. खिडकी दरवाजा : 

पूर्व बाजूस असणाºया या दरवाज्याच्या जागी पूर्वी एक लहानसा दरवाजा होता. त्यास खिडकी किंवा दिंडी असे म्हणत असत.

 ४.गणेश दरवाजा : 

पूर्व दिशेला असलेला हा दरवाजा आहे. दरवाज्याच्या बाहेर गणेश मंदिर असल्याने यास गणेश दरवाजा असे नाव पडले.

 ५. दक्षिण / नारायण / जांभळीचा / नाटकाशाळांचा दरवाजा :  

वाड्यात सगळ्यात जास्त नावे असलेला हा दरवाजा आपल्या वेगवेगळ्या कालावधीत वेगवेगळ्या नावाने ओखळला जात असे. दरवाजा दक्षिण दिशेला आहे म्हणून यास दक्षिण दरवाजा असे म्हणत. पुढे नारायणरावांच्या खुनानंतर त्यांचे प्रेत याच दरवाज्याने वाड्याबाहेर नेले म्हणून त्यास नारायण दरवाजा नाव पडले. या दरवाज्याने नाटकशाळांचा येत-जात असत म्हणून त्यास नाटकशाळांचा दरवाजा असेही म्हणत. या दरवाज्याच्या बाहेर एक जांभळीचे झाड होते म्हणून त्यास जांभळीचा दरवाजा असेही म्हणत.
वाड्यातील तटबंदी व जंग्या


हजारी कारंजेवाड्यात एकत्र करण्यात आलेला कचरा.

खंत :

शनिवारवाड्याचे गतवैभव परत मिळविण्यासाठी सरकारने अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून सुद्धा या वास्तूकडे केवळ ऐतिहासिक दृष्ट्या महत्व देऊन सरकारने आपले हात झटकणे चांगले नाही. केवळ पर्यटनस्थळ घोषित करून किरकोळ डगडुजी करून शनिवारवाडा आपल्या शेवटच्या घटका मोजत असेल की काय असे वाटते.  एवढे नक्की की पुरातन वस्तू असल्याने नवीन डागडुजी करता येत नाही परंतु त्या ठिकाणी त्या जागे विषयी आवश्यक ती माहिती चांगल्या स्वरूपात ठेवण्याची तसदी तरी सरकारने घ्यावी. ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची असलेला शनिवारवाड्याची सध्याची अवस्था बिकट आहे. आवश्यक तेवढे कर्मचारी नेमून परिसराची स्वच्छता करणे गरजेचे आहे. वाड्यात गेल्यानंतर अनेक ठिकाणी पर्यटकांनी फेकून दिलेल्या पिशव्या, बाटल्या दिसल्या विशेष म्हणजे हा सर्व कचरा एका बाजूला नेऊन पेटवून देत असल्याच्या खूणाही दिसल्या. खरे तर अशी पर्यटनस्थळे केवळ पर्यटनस्थळेच नसून, तो आपला एैतिहासिक वारसा आहे. पर्यटकांनीसुद्धा अशा ठिकाणी ठेवलेल्या कचरापेटीतच कचरा टाकणाचे कष्ट करायला हवे. मी एकाट्याने घाण केल्याने काय होणार? असा विचार बदलला पाहिजे. वाड्याची पार्श्वभूमी मागे  ठेऊन स्वत: ‘बाजीराव’ असल्याचा आव आणून काही महाभाग स्टाईलमध्ये फोटो सेशन करताना दिसतात. तटबंदीवरील एखाद्या बुरुजाचा आसरा घेऊन बसलेले जोडपे, शाळा, कॉलेजला दांडी मारून वेळ घालवण्यासाठी फक्त ५ रुपयांत येथे विश्रांतीसाठी आलेल्या  बहाद्दरांना अटकाव करणे गरजेचे आहे. दिल्ली दरवाज्याच्या बाहेरील बाजूस पेपर वाचत बसलेले. हातपाय पसरून निवांत झोपलेले महाभागांना अटकाव केला पाहिजे. बाजीराव पुतळ्याच्या चौकटीच्या खालील बाजूस तर प्रचंड घाण साचलेली दिसते. तेथे स्वच्छता करणे गरजेचे आहे. बाजीरावांच्या पुतळ्यावर कधी काळी अर्पण केलेला हार वाळून खाली पडण्याची वाट पाहणे कितपत योग्य आहे. हे सर्व पाहिल्यावर वाईट वाटते. ब्लॉगवर लिहण्याशिवाय काहीच करू शकत नसल्याची खंत ही वाटते.वाड्याची तटबंदी

तटबंदीवरून खाली वाड्यात जाणाºया पायºया

वाड्यातील तटबंदी व जंग्या.


शनिवारवाड्या शेजारून वाहणारा वाहतुकीचा रस्ता

शनिवारवाड्यातील मस्तानीच्या वाड्यावरील हिरवळ

नगारखान्यातून बाजीराव पेशव्यांचा पुतळा


नगारखान्यातून शनिवारवाड्यातील दृश्य


शनिवारवाड्यासमोरील मोकळ्या पटांगणात विविध सभांसाठी मांडव टाकलेला असतो.

नगारखान्यातील खांबावरील कलाकुसर

दिल्ली दरवाज्यावरील कलाकुसर
शनिवारवाडा पाहण्याची वेळ :
  • सकाळी ८.३० ते सायं. ६.००
  • तिकीट विक्री :
  • ५.४५ ला बंद करण्यात येते. त्यानंतर अर्धा तास पाहण्यासाठी मिळतो.
  • १५ वर्षांखालील मुलास मोफत प्रवेश व त्यावरी प्रत्येक व्यक्तीस ५ रुपये प्रवेश फी आकारली जाते.
  • वर्षभर शनिवारवाडा पाहण्यासाठी उपलब्ध असतो.

कसे जावे :
  • स्वारगेट वरून शनिवारवाड्याकडे अथवा शिवाजीनगरकडे जाणाºया बसने अथवा पायी चालत १५ ते २० मिनिटांत शनिवारवाडा येथे येता येते. वाटेत येताना पुण्यातील मंडई जवळील प्रसिद्ध तुळशीबाग तेथून शनिवारवाड्याकडे येता येईल.
  • रिक्षा सुद्धा शिवाजीनगर, पुणेस्टेशन व स्वारगेट वरून आहेत. 
भाग १ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
या लेख आपणास कसा वाटला यासाठी ब्लॉगवर जरूर प्रतिक्रिया लिहा. मेल करा. धन्यवाद. 


शनिवारवाडा पाहून दगडूशेठ गणपती व अन्य गणपतींचे देखावे पाहण्यास निघालो. घरी आलो तरी डोक्यातून शनिवारवाडा व बाजीराव पेशवे काही जात नव्हते. पुढील संबंध आठवडा बाजीरावांवरील विविध पुस्तके वाचण्यात गेली. बाजीरावांवर या ठिकाणी वाचण्यास क्लिक करा.

No comments:

कॉपी करू नका