Monday, March 4, 2013

लाल महाल

03 March 2013

  लाल महाल   गाडी लावायला जागा मिळाली नाही. तेव्हा बरीच मेहनत घेऊन शेवटी एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये गाडी लावण्याची वेळ आली. 
        पुणे शहराच्या मध्यभागी असलेला हा महाल संपूर्ण लाल असल्याने त्याचे नामकरण ‘लाल महाल’ असे करण्यात आले. शहाजी राजे भोसले यांनी हा महाल आपल्या पत्नी जिजाबाई व मुलगा शिवाजी राजे यांसाठी 1630-34 साली बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बालपणाचा काही काळ  या वास्तूत घालविला. राज्यांनी तोरणा किल्ला  काबीज केला तोपर्यंत ते याच महालात राहत होते. शाहिस्तेखानाची चार बोटीही महाराजांनी या ठिकाणी कापली. 
          काही वादांमुळे लाल महाल काही दिवस बंद होता मात्र, सध्या सकाळी नऊ ते दुपारी एक व दुपारी चार ते आठ वाजेपर्यंत लाल महाल बघण्यासाठी खुला असतो. या ठिकाणी शिवसृष्टी उभारली असून, रायगडाची प्रतिकृती उभारली आहे. १९९४ - ९८ या वर्षी लाल महालाची पुन्हा  डागडुजी करून त्याला पर्यटन स्थळाचे महत्व आणून दिले. महापालिकेने लाल महालाचे व्यवस्थापन सध्या यशश्री महिला पतसंस्थेला दिले आहे. प्रती व्यक्ती दोन रुपये देऊन आत प्रवेश केला. वरील मजल्यावर छत्रपतींच्या काळातील वेगवेगळ्या तलवारी, भाले, बंदूका असा शस्त्रसाठा जूपून ठेवला दिसला. शिवाजीमहाराजांच्या इतिहासातील अनेक युद्धप्रसंग येथे चित्र स्वरूपात रेखटाले आहेत. आगºयाहून सुटका, राज्याभिषेक, पवनखिंड अशी चित्रे येथे रंगवली आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा आणि तोही महाराष्ट्रातील डोंगर,   दºया, नदी यांच्यासकट असा थ्रीडी नकाशाचे छान शिल्पही येथे उभारले आहे. पंधरा ते वीस मिनटांतच लाल महाल पाहून झाला. 

जायचे कसे : 

  • महानगरपालिकेच्या बसस्टॉप वरून रिक्षा करून अथवा बस माहिती असल्यास लाल महालाच्या शेजारील बसस्टॉपवर उतरता येते. अन्यथा हे अंतर पायी सुद्धा कापता येते.
  • पाहण्यासारखी ठिकाणे : त्रिशुंड गणपती, नागेश्वर मंदिर, शनवारवाडा, कसबा गणपती, जोगेश्वरी मंदिर

No comments:

कॉपी करू नका