रविवार 11/11/2012 

 
|  | 
| 
वाई येथील मंदिर. | 
|  | 
| 
वाईतील शंकराच्या मंदिरासमोरील भव्य नंदी. | 
|  | 
| 
 वाईतील गणपती मंदिराशेजारील शंकराच्या मंदिरासमोरील दीपमाळ. | 
|  | 
| 
वाईतील गणपती मंदिराशेजारील श्री काशी विश्वेश्वर मंदिर. | 
|  | 
| 
मंदिरासमोरील भव्य नंदी. | 
 महागणपती ऊर्फ ढोल्या गणपती :
महागणपती ऊर्फ ढोल्या गणपती :
          वाईकडे जाण्याचा रस्ता 
थोडा छोटाच आहे. रस्त्यावर लिहिलेल्या पाटय़ांमुळे विचारण्याची गरज लागत 
नाही. दुपारी 12.30 वाईत पोचलो. गाडी लावून महागणपतीचे दर्शन घेण्यास 
निघालो. वाईचे मुख्य दैवत म्हणजे इथला महागणपती. गणपतीचं देऊळ नदीवर वसलेलं
 आहे. त्याला ढोल्या गणपती असंही म्हणतात. गणपतीची मूर्ती नावाप्रमाणोच 
अवाढव्य आहे. हा गणपती नवासाला पावतो असे म्हणतात. मंदिर 1762 साली 
पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले. गणपतीची मूर्ती 6 
फूट व लांबी 7 फूट अशी आहे. 
नाना फडणवीसांचे मेणवली : 
वाईपासून
 धोम धरणाकडे जाण्याच्या वाटेवर चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर हे मेणवली
 गाव आहे. संथ वाहणारी कृष्णा नदी, आजूबाजूस असणारी दाट गर्द हिरवीझाडी. 
निरव शांतता आहे. नाना फडणवीसांचा वाडा आजही चांगल्या स्थितीत आहे. सुबक 
बांधणीयुक्त व  कृष्णा नदीवरील घाटही पाहून मन प्रसन्न होते. येथील घाट 
शांत व सुंदर आहे. सहा चौकी असलेला हा वाडा आहे. येथे श्रीमंत चिमाजी अप्पा
 पेशवे यांनी वसईच्या किल्ला जिंकल्यानंतर विजयाची आठवण राहावी म्हणून 
तेथील चर्चमधील घंटा येथे आणली आहे. ही घंटा पंचधातूपासून बनवलेली असून, 
घंटेवर जोरात मारले असता मधुर नाद होतो. यावर 1707 असा उल्लेख आहे. येथेही 
परिसरातील लोक नदीचा वापर कपडे व जनावरे धुण्यासाठी यथेच्छ करताना दिसले. 
वाडय़ाच्या दारात दुर्मिळ असलेला गोरख चिंचेचा वृक्ष आहे. वाडय़ात पेशवेकालीन
 चित्रे, कारंजे आहे.  भुलभुलैय्या असलेला आपणास वाटतो. वाडय़ाची काळजी 
घेणारे एक गृहस्थ मला या ठिकाणी भेटले. वाडय़ासंबंधी माहिती देऊन संपूर्ण 
वाडा त्यांनी आम्हाला आतून दाखविला. ज्या काळी हा वाडा राबता असेल त्यावेळी
 वाडा खरच छान असला पाहिजे. नानांचा शिसमचा मोठा पलंग त्यांनी दाखवला. वाडा
 बराच पडझड झालेला आहे. परंतु सुधारणा चालू असल्याचे दिसले. साहजिकच आहे 
एवढा मोठा वाडय़ाची निगा राखणो अवघड आहे.  वाड्याचा बराच भाग बंदिस्त आहे. 
वाडय़ाशेजारून कृष्णानदी वाहते. येथे बांधण्यात आलेला घाट हा  चंद्रकोराकृती
 आहे. उन्हाळय़ात छोटय़ाच्या खिडकीतून कृष्णा नदी व परिसर व देऊळ छान 
दिसते.  या खिडकीतून थंड गार हवा जेव्हा आत येते तेव्हा फारच थंडगार वाटते.
 नानांच्या वाडय़ात त्यांचा पलंग व घरातील नक्षीकाम सुंदर आहे. वाडय़ात 
एकूण 4 विहीरी आहेत.  

 

 
|  | 
| 
चिमाजी अप्पांनी वसई येथून आणलेली पंचधातूची घंटा. | 
|  | 
| मेणवली येथील बांधलेला घाट. शेजारी कृष्णानदी. | 
|  | 
| मेणवली येथील नाना फडणवीस यांनी बांधलेला घाट. शेजारी कृष्णानदी. | 
|  | 
| 
नानांचा वाडा. | 
|  | 
| 
वाईच्या ‘ढोल्या गणपती’ची छोटी प्रतिकृती. | 
|  | 
| 
 नानांच्या वाडय़ातील आतील नक्षीकाम. | 
|  | 
| 
 नानांच्या वाडय़ातील आतील नक्षीकाम. | 
|  | 
| 
 नानांच्या वाडय़ातील आतील नक्षीकाम. | 
चित्रपट व मालिकांमधील वाई परिसर : 
अशा
 या वाई व मेणवली परिसराचे देश व परदेशातील सिनेमांमध्ये समावेश होणो 
साहजिकच आहे.  शुटिंगसाठी देशा-परदेशातली  मंडळी नवीन जागेचा शोध घेत वाईत 
पोहचले. अर्थातच येथील निसर्ग, शेजारीच असणारा महाबळेश्वर, स्वस्ताई यामुळे
 सिनेमा, छोटय़ा पडद्यावरील सीरिअल, जाहिरातदार या वाईकडे आकर्षित झाले. 
आमीर खानची सॅमसंग मोबाइलची जाहिरात, स्वदेसच्या चित्रपटातील शाहरुख खान 
ज्या नदीकाठावर बसतो तो मेणवलीचा नदीकाठ, गंगाजलमध्ये अजय देवगण पारावर उभे
 राहून केलेली डायलॉग बाजी. ही सगळी दृश्य वाई व मेणवली परिसरातील आहेत. या
 ठिकाणी छोटय़ा पडद्यावर सुरू असलेली काही मालिका ही येथूच शूट झालेल्या 
आहेत. जसे ‘अगले जनम मोहे बिटिया किजो’, छोटी बहू, भाग्यविधाता, बैरी पिया,
 गंगा, महाभारत, काशी. तेव्हा जेव्हा कधीही वाई व मेणवलीतील मंदिर पाहल 
तेव्हा या ठिकाणी पिक्चर शुटिंग केल्याचे नक्की लक्षात ठेवाल.
इथून 
जवळच  वाळकी व कृष्णा या नद्यांवर बांधलेले धोम धरण आहे.  वाईतून बाहेर 
पडलं की रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शाळू , ऊस , हळदीची पिकं दिसतात.  
मेणवलीहून जवळ असलेले मांढरदेवीचा डोंगर आहे. या डोंगरावर्पयत गाडी जाऊ 
शकते. इथून आंबोडे खिंडीतून भोरलाही जाता येतं.  येथून जवळ पांडवगड आहे. 
परंतु परिवारासह जाण्यास योग्य नाही. भटक्यांसाठी छान जागा आहे. मांढरदेवला
 जाण्यासाठी गाडी रस्ता आहे.  25 किलोमीटरवर मांढरदेवी आहे. पुणो - भोर 
मार्गे देखील आपण वाईला येऊ शकतो. 
वाईच्या परिसरात गड किल्ले ट्रेकिर्ससाठी मोठी पर्वणीच आहे. पांडवगड, वैराटगड, कमळगड, चंदन-वंदन आदी किल्ले आहेत.
वाईचा महागणपती व मेणवलीचा नानांचा वाडा पाहून महाबळेश्वरकडे जाण्यासाठी निघालो. ऐव्हाना दुपारचे 1.45 वाजले होते. 
कसे जाल : 
- पुणे-खेड शिवापूर-शिरवळ-खंबाटकी घाट-सुरुर-वाई.
- पुणे-खेड शिवापूर-भोर-मांढरदेव घाट-वाई.
- सातारा-पाचवड-भुईंज-ओझर्डे-वाई. 
दुपारी 1.45 ला मेणवलीमधून निघालो. पसरणी घाटमार्गे पाचगणी रस्ता छान आहे. घाट संपताच पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सुरू होते. पाचगणीमध्ये पाचगणी पालिकेचा 90 रुपयांचा टोल भरून टेबल लॅण्ड पाहण्यास गेलो. तेथे 10 रुपये पार्किग आहे. टेबललॅण्डवर महाराष्ट्रातील मोठे पठार आहे. येथून पाचगणी, महाबळेश्वर व वाईचा परिसर दिसतो. दुपारी 1.25 ला महाबळेश्वरकडे जायला निघालो.  वाटते पारशी पाईंट दिसतो.  तेथेही पार्किग आहे. वेण्णा लेक वाटेत दिसतो. प्रत्येक माणशी 325 /- (1 तासाकरिता) बोटिंग आहे. तेथून पुढे निघालो 1.45 वाजले होते. भूक लागली होती. महाबळेश्वरच्या आधी मस्त अर्धा तास पुन्हा ट्रॅफिक  लागली होती. मग गाडीतच घरून आणलेली पोळी भाजी खाल्ली. जुन्या महाबळेश्वरला जायचे मनात ठरले होते. मात्र, महाबळेश्वरला गेल्यावर नेहमी सारखा रस्ता चुकला व मुंबई-गोवा हायवेकडे जाणा:या रस्त्यावर जायला निघालो. चौकशी करून पुन्हा माघारी फिरलो.
 
|  | 
| 
पाचगणीच्या टेबल लॅण्डवरून दिसणारे दृश्य. | 
|  | 
| 
पाचगणीच्या टेबल लॅण्डवरून दिसणारे दृश्य. | 
|  | 
| 
वेण्णा तलाव, महाबळेश्वर | 
  लॉडविक पाईंट व एलिफंट हेड पाईंट : 
|  | 
| 
 लॉडविक पाईट वरून दिसणारे महाबळेवरचे जंगल. | 
|  | 
| 
 लॉडविक पाईट वरून दिसणारे महाबळेवरचे जंगल.  | 
|  | 
| 
लॉडविक पाईट वरून दिसणारा सावित्री नदीचा धबधबा. | 
|  | 
| 
प्रतापगडाकडे जाणारा महामार्ग. | 
|  | 
| 
लॉडविक पाईट | 
|  | 
| 
लॉडविक पाईट  | 
 एक रस्ता लॉडविक पाईंट व एलिफंट हेड पाईंटकडे जात होता. रस्ता खूपच उतार असलेला होता. गाडीने तब्बल 10 मिनिटे उतरल्यावर गाडी पार्किग केलेल्या दिसल्या. हा रस्ता सायंकाळी 5 नंतर खूपच भीतीदायक असेल कारण वाटेत घनदाट जंगल आहे. तेथे पोचल्यावर समोरील डोंगरातून उगम पावणारी सावित्री नदीचा धबधबा दिसला. या पॉईंटवर जाण्यासाठी तब्बल 15 ते 20 मिनिटे चालत जावे लागते. येथे पोहोचल्यावर समोरील डोंगरात प्रतापगड व कोकणात उतरणा:या वाटा दिसल्या. निसर्ग सौंदर्य पाहून परतीचा मार्ग धरला. ऐव्हाना 4.क्क् वाजले होते. तेथून पुन्हा रस्ता विचारून जुन्या महाबळेश्वरला गाडी वळवली.  
जुने महाबळेश्वर :  
|  | 
| 
 जुन्या महाबळेश्वरमधील शंकराचे मंदिर. | 
|  | 
| 
 जुन्या महाबळेश्वरमधील शंकराचे मंदिर. | 
|  | 
| 
मंदिराशेजारील बाजारपेठ. | 
|  | 
| 
अतिमहाबळेश्वर मंदिरा बाहेरील नंदी. | 
|  | 
| 
श्री पंचगंगेचे मंदिर. येथून पाच नद्यांचा उगम होतो. | 
  महाबळेश्वराचे देऊळ हे यादव राजाने तेराव्या शतकात बांधले असल्याचे समजले. अफझल खानाच्या तंबूवरचे कापून आणलेले हे सुवर्ण कळस महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले. येथील शंकराची पिंड स्वयंभू असल्याचे सांगण्यात आले. मंदिर खूपच छान आहे. आतमध्ये कोरीव काम केलेले आहे. मंदिर पुरातन काळचे आहे. याठिकाणी अतिमहाबळेश्वर व महाबळेश्वर ही दोन मोठी शिवमंदिरे बांधलेली  आहेत. यादव राज्यांनी बांधलेल्या या हेमांडपंथी मंदिराजवळ चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधले त्यात कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्नी, गायत्नी या पाच नद्या उगम पावल्या आहेत. मंदिराच्या शेजारी छोटा बाजार आहे. येथे पार्किग 20 रुपये आहे. 
  
ऑर्थर सीट पाईंट 
|  | 
| आपले पूर्वज. | 
|  | 
| ऑर्थर सीट पाईंटच्या अलिकडून घेतलेले छायाचित्र. |  |  | 
|  | 
| ऑर्थर सीट पाईंटच्या अलिकडून घेतलेले छायाचित्र. | 
|  | 
| ऑर्थर सीट पाईंट. | 
|  | 
| ऑर्थर सीट पाईंटच्या अलिकडून घेतलेले छायाचित्र. या फोटोत ऑर्थर सीट पाईंट. बारीक दिसत आहे. L-810 Nikon
 | 
 | 
 तेथून 4.30 ला  ऑर्थर सीट व विडो पॉईंट पाहण्यास निघालो. पुन्हा उपद्रव शुल्क म्हणून 10 रुपये नगरपालिकेला दिले. ऑर्थर सीट पाईंट अंदाजे 7 ते 8 किलोमीटर आहे. वाटते पूर्ण जंगल आहे. सायंकाळी 5 नंतर जाण्याचे टळलेले बरे. तेथे 5 ला पोचलो. ऑर्थर सीट व विडो पॉईंट  तेथून बरेच लांब चालायचे होते. थोडेच अंतर चालत गेलो. फोटो सेशन केले. 5.30 ला परत त्याच मार्गाने यायला निघालो. महाबळेश्वरमधील बाजारपेठ 6 वाजेर्पयत पाहिली.  6 ला घरचा रस्ता धरला. अंधार पडल्यावर गाडी चालावायला अजूनच मजा येत होती. 
|  | 
| Nikon L - 810 कॅमे:यातून घेतलेले फुलाचे चित्र. | 
|  | 
| Nikon L - 810 कॅमे:यातून घेतलेले फुलाचे चित्र. | 
|  | 
| Nikon L - 810 कॅमे:यातून | 
|  | 
| महाबळेश्वर मार्केटमधील लाल दिसणारा पण आतून पांढरा व गोड मुळा. | 
महाबळेश्वर - वेण्णा तलाव - पारशी पाईंट - पाचगणी - पसरणी घाट - वाई नंतर हायवे व तेथून पुण्याकडे असा मार्ग 2 तासात कापून खेड शिवापूर येथील टोल नाक्यापुढे चहा पिऊन परत घरचा मार्ग धरला. पिंपरी ते महाबळेश्वर अंतर 140 किलोमीटर आहे. एकूण 345 किलोमीटर अंतर झाले. 
 
 
6 comments:
सुंदर छायाचित्रं!
मित्र छायाचित्र सुंदर आहेतच. वाई व मेणवली विषयी अजून माहिती असेल तर जरून लिहा. बाकी सुंदरच.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
मेणवलीचा घाट व वाई परिसराविषयी माहिती आहे.
लवकरच ती प्रकाशित करतो. धन्यवाद.
मागील आठवड्यातच मी वाईला व महाबळेश्वरला गेलो होतो.
तुमच्या या माहितीचा चांगला उपयोग झाला. धन्यवाद. असेच फेरफटका करत रहा.
सुरुवात कोठून करायची
नव्या भटकंती साठी पूरक माहिती आहे भटकत रहा लिहीत रहा
Post a Comment