मावळ परिसर

    मावळ परिसर

     पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड शहराचे महत्त्व वाढत आहे. हिंजवडी येथील आयटीपार्क असो वा आशिया खंडातील सर्वात श्रीमंत समजली जाणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यामुळे पिंपरी-चिंचवड नावारुपाला आले आहे. बेस्ट सिटीसाठीकडे घौडदौड सुरू आहे. अशाच शहराच्या शेजारील ४० ते ५० किलोमीटरवर असलेला मावळ परिसरात अनेक पर्यटन स्थळे आहेत. लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची, ढाकचा बहिरी, घोरावडेश्वर, हाडशी येथील सत्यसाईबाबा यांचे मंदिर, प्रतिशिर्डी शिरगाव येथील साईबाबांचे मंदिर अशी अनेक पर्यटन स्थळे या भागात आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या या मावळातील प्रमुख उत्पन्न आहे ‘तांदूळ’ इंद्रायणी, आंबेमोहर सारखा तांदूळ याच भागात पिकविला जातो. लोणावळा, खंडाळासारखी ठिकाणे हे तर प्रमुख आकर्षण. पावसाळ्यात या मावळ भागात तर पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे येऊ लागतात. प्रचंड उंचीवर कोसळणारे धबधबे, भुशी डॅमचे आकर्षण सर्वांनाच मोहून टाकते. सहारा येथील अ‍ॅम्बी व्हॅलीतून भटकंती करणे म्हणजे जणूकाही स्वर्गच. अशा मावळातील पर्यटनाविषयी......



    • अमरजाई मंदिर
    • धम्मभूमी (देहूरोड)
    • सुब्रतोरॉय सहारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम 
    • इंदोरीतील भुईकोट
    • कोटेश्वरवाडी (कुंडमळा व भुईकोट किल्ला यांच्या मध्यावर इंद्रायणीकाठी असलेल्या कोटेश्वरवाडी येथे पुरातन हेमाडपंती कोटेश्वराचे मंदिर आहे. )
    • एकवीरादेवी
    • सेलिबेट्री वॅक्स म्युङिायम (वरसोली)
    • करंजगावचा पेशवे कालीन तलाव, 
    • वाडिवळेचे संगमेश्वर मंदिर, 
    • घोडोबा मंदिर, 
    • शिरदेचा कुंडलिका नदीपूल, 
    • जांभवलीचे कोंडेश्वर मंदिर, 
    • थोरणचा गुरुद्वारा, 
    • उकसानचे वाडिवळे धरण
    • डय़ुक्स नोज (नागफणी)- 
    • टायगर्स लीप (वाघदरा) - 
    • भूशी तलाव (डॅम) 
    • वलवण तलाव (डॅम) - 
    • पेशव्यांच्या मामांचे गाव (किवळे)

    No comments:

    कॉपी करू नका