Saturday, June 11, 2011

चिपळूण-विध्यंवासिनी-हेदवी-गुहागर-व्याडेश्वर

करंजेश्वरी देवी

करंजेश्वरी मंदिरातील सजावट.


कंरजेश्वरी देवी.





गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का.

धक्यावरून दिसणारा परिसर. परशूराम मंदिर येथून दिसते.


चिपळूण हे मुंबई-गोवा हायवेवरील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. चिपळुणला परशुरामाचे पुरातन काळी बांधलेले मंदिर आहे. निसर्गरम्य कोकणात भगवान परशुरामांच्या भूमीत वाशिष्ठी नदीच्या तिरी गोविंदगडाच्या पायथ्याशी गोवळकोट येथे श्री देव सोमेश्वर व देवी करंजेश्वरीचे भव्य मंदिर आहे. अनेक कोकणस्थ लोकांची कुलस्वामिनी म्हणून करंजेश्वरी देवी प्रसिद्ध आहे. .चिपळूण पासून जवळ सुमारे 4 किलोमीटरवर असलेल्या गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याशी हिचे मुख्य स्थान असून मंदिर अतिशय सुंदर व निसर्ग रम्य परिसरात आहे . गोवळकोट किल्ल्यामध्ये रेडजाई देवीचे स्थान आहे. देवीच्या समोर सोमेश्वर महादेवाचे स्थान आहे. पटवर्धन, दीक्षित आडनावाच्या लोकांची ही कुलदेवता आहे. तर गुहागर येथील व्याडेश्वर कुलदैवत आहे.

कथा : करंजेश्वरीचा शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठी गर्दी असते. जागृत व पवित्न देवस्थान म्हणजे श्री देवी करंजेश्वरी. शहरातील पेठमाप गोवळकोट भागातील ग्रामस्थांचे हे ग्रामदैवत आहे. पूर्वीच्या काळी एका करंजीच्या झुडपात ही देवी प्रकट झाली. म्हणून तिला करंजेश्वरी असे नाव पडले. ती ज्या झुडपात प्रकाट झाली, तेथील जागेला शिंगासन असे म्हटले जाते. प्रकट झाल्यानंतर देवीने एका कुमारिकेला हळद-कुंकू आणण्यास सांगितले. कुमारिका हळदी-कुंकू आणण्यास गेल्यानंतर देवी अदृश्य झाली. ती पुन्हा गोवळकोट येथे प्रकट झाली. नंतर एका भक्ताच्या स्वप्नात येऊन तिने सांगितले की, करंजीच्या झुडपात नाकातील मोती अडकला आहे. तो घेऊन या. त्यानुसार तेथे मोती सापडला. ही घटना 300 ते 350 वर्षांपूर्वीची आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे या देवीचे कुलभक्त आजही करंजीचे तेल वापरत नाहीत.
किल्ल्यात सध्या वस्ती नाही. सागराकडून येणारा व्यापारी मार्ग या खाडीतून येत असल्याने चिपळूणला बंदर म्हणूनही महत्त्व प्राप्त झालेले होते. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी खाडीच्या मुखावर अंजनवेलचा गोपाळगड तर खाडीच्या आतील भागात चिपळूणचा गोवळकोट हा किल्ला उभारला गेला. गोवळकोट खाली बहुतांश मुस्लिम  वस्ती  आहे. उत्सवात सोमेश्वर व करंजेश्वरीच्या पालख्या मशिदीजवळ जातात. तेथे मुस्लिम समाजातील मानक:यांच्या हस्ते देवीची पूजा केली जाते. त्यानंतर होळी लावली जाते. पालखी गोविंदगडावर रेडजाई देवीच्या भेटीसाठी जाते. तेथे जगताप यांच्या हस्ते देवीची पूजा होते. हजारो महिला खणा-नारळाने देवीची ओटी भरतात आणि नवास बोलतात. नवसाला पावणारी देवी असा करंजेश्वरीचा लौकिक आहे. येथे राहण्याची सोय आहे. फक्त नवरात्रत जागा उपलब्ध आहे की नाही याची चौकशी करूनच मुक्कामाला जायला हवे. शक्यतो नवरात्रत जागा मिळणो कठीण असते.

कालभैरव व श्रीदेवी जोगेश्वरी :

श्री. देव जुना कालभैरव व श्रीदेवी जोगेश्वरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुप्रसिध्द ग्रामदैवत जागृत श्री जुना कालभैरव व श्रीदेवी जोगेश्वरीचे पुरातन मंदिर वसले आहे. हे देवस्थान श्रीक्षेत्र परशुरामांशी संबंधित आहे. 

विध्यंवासिनी  :

मुंबई-गोवा हायवेवर चिपळूण सोडल्यानंतर सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर डाव्या गोव्याकडे जाताना डाव्या हाताला विध्यंवासिनी मंदिराकडे जाणारा फाटा लागतो. श्री देवी विध्यंवासिनी रावतळे येथील डोंगरात 

विध्यंवासिनी मंदिर.

विध्यंवासिनी

विध्यवासिनी मंदिरा शेजारी कोयना जलविद्युत केंद्राची भुकंप शाळा


 श्री देवी विंध्यवासिनीचे पुरातन जागृत देवस्थान आहे. भारतातील बारा शिक्तपीठांपैकी विंध्यवासिनीचे मुख्यपीठ उत्तरप्रदेशात विंध्याचल येथे आहे. वसुदेव देवकीचे अपत्य समजून तिला कंसाने शिळेवर आपटण्यासाठी उचलले त्याचक्षणी ती कंसाच्या हातातून निसटून अंतराळात गेली आणि विंध्याचल येथे प्रकटली. तीच विंध्यवासिनी देवी होय. अशी येथे माहिती आहे. मंदिराच्या पाय:या चढून जाण्याच्या आधी डावीकडे अगिस्त कुंड लागते. यात बारमाही पाणी असत. मंदिरा शेजारी कोयना जलविद्युत केंद्राची भुकंप शाळा आहे. मंदिराच्या शेजारील मोठे धबधबे आहेत. मंदिरात नवरात्नौत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा दर मंगळवार, शुक्र वार गर्दी असते. ¨जोशी यांची ही देवी आहे. शेजारी मोठा पाण्याचा कुंड असून, मागील डोंगरामधून मोठा धबधबा कोसळतो. त्याचे पाणी कुंडात येते.  

व्याडेश्वर

चित्पावन ब्राह्मण घराण्यांमध्ये जास्तीत जास्त घराण्यांचे कुलदैवत हे गुहागर येथील समुद्रतीरी श्री क्षेत्र व्याडेश्वर होय. व्याडेश्वरला शंकराचे मंदिर आहे.  गुहागर गावामध्ये बस स्टॅंडचे जवळच हे मंदिर आहे. 


 देवळाभोवती प्रशस्त व स्वच्छ जागा आहे. येथे निवासाची सोय  आहे.  या मंदिराचे वार्षिक उत्सव हे त्रिपूरी पौर्णिमा व महाशिवरात्र आहे. मंदिराच्या मागे पाच मिनिटांवर समुद्रकिनारा असून नारळी पोफळीच्या बागा आहेत.

गुहागर

गुहागर समुद्रकिनारा

गुहागर समुद्रकिनारा
चिपळूणपासून 45 किलोमीटर गुहागरचा समुद्रकिनारा आहे. शेजारीच 5 मिनिटांच्या अंतरावर व्याडेश्वराचे मंदिर आहे. समुद्रकिनारा मोठा व स्वच्छ आहे.

श्री दशभुज लक्ष्मीगणोश - हेदवी

    गुहागर पासून 25 किलोमीटर अंतरावर हेदवी हे गाव आहे. तटबंदीने वेढलेले थोड्या उंचीवरील  मंदिर वर चढून जाण्यासाठी पाय:या आहेत.  पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे गणोशभक्त राहत होते. त्यांची पुण्याला पेशव्यांशी भेट झाली असता त्यांना वर्तवलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे 


हेदवी मंदिरातील गणोशमूर्ती.
 पेशव्यांनी त्यांना त्या काळी मंदिर बांधण्यासाठी पैसे दिले. त्या पैशातून हे मंदिर उभारले. गणपतीची मूर्ती काश्मीर मधील पाषाणापासून बनवलेली आहे. दहा हातांची ही मूर्ती आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहत आहे असे वाटते.मंदिर आवारातच दीपमाळही आहे  मंदिर परिसरात असलेली गर्द आंब्याची झाडे आहेत.  दर संकष्टी व विनायक चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते. हेदवी गावाजवळ स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा आहे. श्री उमा महेश्वर मंदिर  हेदवीच्या समुद्रकिनारी डोंगराच्या पायथ्याशी उमा महेश्वराचे मंदिर आहे. अहल्याबाई होळकरांनी दिलेल्या देणगीतून हे मंदिर उभारल्याचे सांगितले जाते. समुद्रकिनारी खडकाळ भागात थोड्या उंचीवर असलेल्या या मंदिरापर्यंत भरतीचे पाणी येते. गाभा:यात एक शंकराची पिंड असून मंदिराजवळच एक पाण्याचे कुंडदेखील आहे.
हेदवी मंदिर परिसर



हेदवी मंदिर



हेदवी मंदिर परिसर

बामणघळ

बामणघळ हेदवीचा किनारा हा स्वच्छ असून सुरिक्षत आहे. उमा महेश्वर मंदिराच्या बाजुने डोंगराच्याकडेने चालत गेल्यास पुढे खडकात पडलेली एक मोठी भेग दिसते. भरतीच्या वेळेस येथे उंच लाट उसळते. डोंगरावर समुद्राचे पाणी आदळून एक अरुद घळ तयार झाले आहे. पाण्याच्या अंदाज येत नाही त्यामुळे जरा सावध राहायला हवे.

जायचे कसे


- पुणो - ताम्हिणी घाट मार्गे - वेळे - निजामपूर - माणगाव- महाड- पोलादपूर- खेड- चिपळूण
- वरंधा घाट मार्गे- पुणो - सातारा रोडने  कापूरव्होळ - भोर/ वरंधा घाट महाड - पोलादपूर- खेड- चिपळूण 
- महाबळेश्वर घाट  मार्गे- पुणो - सातारा रोडने  खंबाटकी घाट ओलांडल्यानंतर वाई फाटा- वाई- पाचगणी - 
- महाबळेश्वर - पोलादपूर- खेड- चिपळूण 
- उंब्रज मार्गे पाटण- कोयनानगर- चिपळूण (चांगला मार्ग आहे.)

 कॅमेरा नसल्या कारणाने काही ठिकाणचे फोटो काढण्याचे राहुन गेले. पुढील भेटीत नक्की फोटो जोडतो.

खालील चिपळुण नगरपालिकेची लिंक पहा.

http://www.cmcchiplun.org

Wednesday, April 20, 2011

गोवा पर्यटन..!



गोवा पर्यटन..!


बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल्याने यावर्षी कुठेतरी लांब ¨हडायला जायचे ठरले. अर्थातच सुमद्रकिनारी. मग माहिती घेऊन गोव्याला जाण्याचे पक्के केले. सुरेश परबच्या मित्रने लगेच ओळखीचे कळंगुटला हॉटेल बुक करून दिले. तेथे मुक्काम करण्याची चांगली सोय झाली.
गोव्यातील पर्यटनाची सुरूवात या राजधानी असणा-या पणजी शहरापासूनच होते. गोव्यात प्रामुख्याने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोन विभाग आहेत. पणजी हे शहर उत्तर गोव्यात आहे. गोव्यात जाण्यासाठी योग्य वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च हा काळ होय.






आमचा प्रवास

सायंकाळी 4 ला पुण स्टेशनवरून निजामउद्दीन-वास्को द गामा रेल्वेने प्रवास सुरू झाला. वाटेत उरळीकांचनला पोलिसांनी दरवाजे बंद करण्याच्या सूचना दिल्या. घरून आणलेले जेवण जेऊन रात्रभर प्रवासाचा आनंद घेत जागलो. मिरज जंक्शनला गाडी थांबली तेथून बराच वेळ जागा होतो. मडगाव रेल्वेस्टेशनवर सकाळी 7 ला उतरलो. तेथून बसची सोय पटकन होत नाही. प्रायव्हेट कार आहेत मात्र त्या पणजीला घेऊन जाण्यासाठी 1000 रुपये मागतात. अर्थातच रेल्वेस्टेशनवरून थोडे अंतर चालून गेल्यावर मोठय़ा रस्तावर आलो. तेथून पणजीला जाणा:या कदंबच्या बसेस आहेत.  अतिशय स्वस्त दर आहेत. किरकोळ तिकीट असते. 10 रुपये, 5 रुपये असे. पणजी येथे राज्यातून बसेस येतात. गोव्यात सर्वच ठिकाणी बसेस उपलब्ध आहे. चौकशी करून पणजीहून कळंगुटला जाणारी बस पकडली.
कळंगुटला पोहचल्यावर हॉटेलमध्ये जाऊन रुम ताब्यात घेतली. फ्रेश होऊन लगेच बिचवर जायचे ठरले. उन्हाळा असला तरी ढगाळ वातावरणामुळे उन जाणवत नव्हते. कळंगुटपासून बस करून जवळच असलेल्या बिचवर गेलो. उन नसले तरी समुद्राची वाळू गरम गरम पायाला भाजत होती. किना:यावर एक मोठे जहाज दुरुस्तीसाठी लंगर टाकून थांबले होते. एवढे मोठे जहाज प्रथमच प्रत्यक्ष पाहत होतो.

कळंगुट बीच




 
बागा बीच - कलगुंट आणि अंजुना बीचच्या मधे हा बीच आहे. म्हापसा येथून 1 कि.मी. अंतरावर हा बीच आहे. इतर समुद्रकिना:यांच्या तुलनेत इथे गर्र्दी थोडी कमीच मिळाली. हॉटेल्स चांगले आहेत. पणजीपासून हा बिच 6 किलोमीटरवर आहे. आमच्या हॉटेलपासून हा बिच 1 किलोमीटरवर होता. त्यामुळे दोन-तीनदा या बिचवर जाऊन आलो.
हॉटेल मालकाला विचारून तेथून टुरिस्ट बस बुक केली. बस सकाळी 7 ला येणार होती. दुस:या दिवशी टूर कंपनीची बस आली. आम्ही तयार होतो. हॉटेल खाली एक छोटे हॉटेल होते. तेथे उपमा व चहा चांगला पोटभर खाल्ला. माणसी 250 रुपये असे या टूरचे पॅकेज होते. प्रथम नॉन एसीचे दर दिले होते. मात्र, टूरवाल्याने एसी चालू करून 50 रुपये जादा घेतले.
प्रथम त्यांनी जुन्या पणजीला बस नेऊन तेथील प्रेक्षणीय स्थळे दाखवायला सुरूवात केली.

सेंट झेवियर्स  चर्च 





गोव्यातील एक ख्रिस्त धर्म प्रसारक सेंट झेवियर्स  यांचे मृत शरीर या चर्चमध्ये एका पेटीत जतन करून ठेवले आहे. दर 10 वर्षांनी हे शरीर दशर्नासाठी बाहेर काढले जाते. या चर्चमधील कोरीव नक्षीकामही उत्कृष्ट आहे. गोव्यातील सर्वाधिक लोकप्रिय चर्च आहे. येथे संघम चित्रपटातील बरेचसे शुटिंग झाले आहे. चर्च मोठे असून, या चर्चसमोर रस्ता ओलांडून आणखीन एक चर्च आहे.  
 

चर्च ऑफ अवर लेडी ऑफ रोजरी

गोव्याच्या प्राचीन चर्चपैकी हे एक चर्च आहे.  पोर्तगीज अल्फान्सो दी अलबुकर्क सन 1590 मध्ये या चर्चमध्ये आले होते. त्याचा तपशील येथे दिला आहे. चर्चमध्ये चित्रे रेखाटण्यात आली आहेत.



तेथून पुढे टूरवाल्यांनी प्राचीन गोवा संग्राहलाय दाखवायला नेले. प्रवेश फी फक्त 250 रुपये प्रति माणसी असल्याने अर्थातच पाहिले नाही. बघणा:यांनी सुद्धा जास्त काही खास नसल्याचे सांगितले.दुपारी 12.30 ला त्यांच्या ओळखीच्या हॉटेलमध्ये नेऊन जेवण करण्यास सांगितले. जेवण करून श्री शांतादुर्गा मंदिर पाहण्यास निघालो.

श्री मंगेश मंदिर





पणजीपासून 23 किलोमीटरवर असलेल्या फोंडा येथे हे भगवान शंकराचे भव्य मंदिर आहे.  पांढ:या शुभ्र रंगाने मंदिर रंगवलेले आहे. मंदिरा समोर एक उंच दीपमाळ आहे. ही दीपमाळ भव्य आणि सुंदर आहे. मंदिराच्या समोरच एक बांधकाम केलेलं स्वच्छ पाण्याचं तळं आहे.  पांढ:या शुभ्र रंगाचे हे मंदिर आहे. मंदिर 400 वर्षे जुने असल्याचे येथे सांगितले जाते. चहूबाजूने हिरवळ व डोंगरांनी वेढलेले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे हे गाव.


शांतादुर्गा मंदिर 

पणजीपासून अंदाजे 33 कि.मी. अंतरावर असणा:या कवळे  या ठिकाणी हे श्री शांतादुर्गा मंदिर आहे. या मंदिराचा कळस सुंदर आहे. गोव्यात पाऊस जास्त. त्यामुळे  येथील मंदिराचे रुप सुद्धा महाराष्ट्रातील मंदिरांपेक्षा वेगळे दिसले. ािस्ती धर्म, पोर्तगीज धर्मचा येथील मंदिर बांधणीवर असलेला प्रभाव चांगला दिसला. मंदिर सुरेख आहे.


मत्सालय








नाव आठवत नाही पण मत्सालय पाहायला गेलो. या मत्सालयात 5क् रुपये तिकीट होते. पैसे वसूल झाले. वेगवेगळय़ा जातीचे मासे येथे होते. हातात जिवंत लॉबस्टर आपल्याला येथे पकडता येतो. अर्थात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच.

दोना पोला






प्रेमी युगुलांचे आकर्षण असलेले हे ठिकाण असून, या ठिकाणी दोना आणि पोला या दोन प्रेमी युगुलांच्या प्रेमाची आठवण करून देणारा त्यांचा पुतळा आहे. येथे एक दुजे के लिय, सिंघम हे चित्रपट शुटिंग केले आहे.

वाघातोर बीच

पणजी शहरापासून 24 कि.मी. अंतरावर हा बीच आहे. हा बीच आपल्याला एक दुजे के लिए या चित्रपट सुद्धा येथेच शूट केला.

संध्याकाळी 6 ला पणजीला परत आलो. तेथे मांडवीनदीत पर्यटकांसाठी खास छोटय़ा लॉचवर असतात. त्याचे दर माणसी 150 रुपये आहे. जहाजावर पर्यटकांच्या मनोरंजनासाठी खास ऑर्केस्ट्राची सोय केलेली असते. या पार्टीत आपल्याला कोकणी-मराठी गाणी आणि नृत्याचा कार्यक्रम पाहायला मिळतो. आपणाला यात सहभागी करून घेतात. मांडवी नदीतून रात्री केला जाणारा हा फेरफटका मनाला भुरळ घालतो. नदीत दिसणारी मोठ-मोठी कॅसीनो हॉटेल्सही आपल्याला दिसतात.

 रात्री 8.30 ला पुन्हा कळंगुटला टूर बसने सोडले. तेथून पुन्हा कळंगुट बिचवर जेवणासाठी गेलो. येथे बाजारपेठ छान आहे. पण पुण्यातील तुळशीबागेत जे मिळते. ते इथेही मिळते. त्यामुळे खरेदीचा मोह टाळला. किरकोळ खरेदी करून हॉटेलवर परतलो.

दुस:या दिवशी संध्याकाळी 7.30 ला पुण्याला जाणारी आमची नीता ट्रॅव्हल्सची बस होती. कळंगुटला पोहचल्यानंतर पुण्याला परतीसाठी प्रथम बुकिंग केले. न जाणो गाडीच मिळाली नाही तर. पणजीतून मापस्याला नीता ट्रॅव्हल्सची बस येणार होती. दुपारी 12.30 ला कळंगुट सोडले. तेथून मापश्याला आलो. 






अंजुना बिच

मापश्याहून अंजुना बिच बघायला गेलो. किरकोळ दर असल्याने बसमध्ये बसून सुमारे अर्धा तासाने बिचवर पोहचलो. गाडी दुस:या मार्गाने जाणार असल्याने त्या महाभागाने वाटेत सोडले मग सुरू झाला 1.5 किलोमीटरचा पायी प्रवास. पाठीवर भलीमोठी बॅग. अध्र्या तासाने घामाघुम होऊन एका हॉटेलमध्ये जेवण उरकले. तेथून अंजुना बिच पाहायला गेलो. हा सुद्धा छान बिच आहे. विशेष करून बाहेरील देशातील बहुसंख्य पर्यटक येथे उन खाण्यासाठी येतात. आम्ही गेलो तेव्हा तसे काही नव्हते. तेथून परत मापश्याला गाडीने आलो. 



मापसा :

मापसा येथे मोठी बाजारपेठ असून, तेथे काजू विक्री मोठय़ा प्रमाणावर होते. आम्ही गेलो तेव्हा गावाचा बाजार असल्याने गावागावातून आलेले ग्राहक व पर्यटकांमुळे येथे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पुण्यातील स्वारगेटप्रमाणो या ठिकाणांहून बाहेर जाणा:या म्हणजे पुणो, मुंबईकडे जाणा:या बसेस येतात. काजू, बदाम, वेगवेगळय़ा भाज्या, कपडे, कधीही न बिघतलेल्या भाज्या पाहण्यात चांगलाच वेळ गेला. तेथून बसची वाट पाहण्यासाठी थांबलो. सायंकाळी 7.45 ला गाडी आली. तोर्पयत गाडी येते का नाही याची भीती वाटत होती. नाहीतर पुन्हा काळंगटला परत यावे लागणार होते. पणजीतून गाडी सुटते व मापसाला येते. येथून पुण्याला जाते. येथेही बुकिंग करता आले असते. बस स्लिपरकोच असल्याने कधी झोप लागली ते कळलेच नाही.

समुद्रकिना:यापासून ते चर्च, मंदिरे, श्रीमंतांचे कॅसीनो आदी येथे सर्व काही इथे पाहायला मिळते. समुद्रकिना:यावर पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटणारे परदेशी पाहुणो..भव्य-दिव्य आणि उत्कृष्ट कलाकुसर असणारी चर्च..मंदिरे..उंच नारळाची हिरवीगार झाडी..समुद्रतील छोटी मोठी गलबते.. पाहून गोवाला परत येण्याचा निश्चिय करून परतीचा मार्ग धरला. 

काही टिप्स :

1) गर्दीच्या वेळी गोव्याला मुक्काम करणो अवघड आहे. 

2) स्वत:ची गाडी असली तरी टुरिस्ट बस करणो केव्हाही परवडेल कारण गोव्यातील काही ठिकाणो बरीच लांब आहेत. तसेच अनोळखी रस्ते शोधत बसण्यापेक्षा पैसे देऊन प्रवासाचा आनंद लुटावा हेच बरे.
3) काही बिचेस जवळ जवळ आहेत. त्यामुळे कदंब ट्रान्सपोर्टची सोय उपलब्ध आहे. किरकोळ तिकीट असते.


कॉपी करू नका