Wednesday, April 6, 2005

उटी

उटी

 

बोटॅनिकल गार्डन

 31/3/2005 ते 5/4/2005


नवीन जोडप्यांसाठी हनिमूनसाठी प्रसिद्ध महाबळेश्वर, गोवा, कुलु-मनाली , शिमला, माथेरन ही थंड हवेची ठिकाणो आहेतच पण ज्याला  ‘क्वीन ऑफ हिलस्टेशन्स’ म्हणतात त्या उटीला जायचे माङो नक्की ठरले. हॉटेल बुकिंग, रेल्वे बुकिंग व साईट सिनचे बुकिंग माङया मित्रने करून दिले होते. त्यामुळे जास्त काही शोधण्याची वेळ आली नाही. 
           थंड हवेचे ठिकाण म्हणून उटी प्रसिद्ध आहे. यालाच  ‘उधगमंडलम’ असेही म्हणतात. या ठिकाणास क्वीन ऑफ हिलस्टेशन्स  असे म्हटले जाते.
        31 मार्चला पुणे स्टेशन ते कोईबंत्तुर जंक्शनर्पयतचे  दोन माणसांचे एसीचे 3526.00 एवढे होते. रात्री 11.45 ला गाडी होती. दुस:या दिवशीची रात्र व तिस:या दिवशी 7 ला सकाळी ‘उधगमंडलम’ला पोचलो. आयुष्यातच प्रथमच टॅक्सीवाला आमच्या नावाची पाटी घेऊन उभा होता. मोठय़ा आनंदात आमच्या बॅग देत अॅम्बेसिटरमध्ये बसलो. येथून उटी 100 किलोमीटर अंतरावर आहे. वाटेतील रस्ते व घाट मस्तच आहे. उंचच उंच सुरची झाडे, गर्द हिरवेगार डोंगर, नागमोडी वळणो अश्या रस्त्यातून हॉटेल कधी आले ते कळलेच नाही. सकाळचे 11 वाजले होते. हॉटेलमध्ये फ्रेश होऊन जेवण केले. दुस:या दिवशी सकाळी 7.30 ला साईट सिनसाठी गाडी येणार असल्याचे रेसप्शनने सांगितले.
         आमचे बुक केलेले हॉटेल शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर होते. समोरच मोठे तळे होते. दुपारी थोडी विश्रंती घेऊन हॉटेलच्या आजुबाजूचा परिसर पाईच हिंडायचे ठरवले. हॉटेलच्या मागे एक छोटी चहाची टपरी होती. चार उटीत राहिलो तोर्पयत वेळ मिळाला की तेथे चहा पिऊन यायचो. तेथे बारामतीमधून लाकूड घेऊन जाण्यासाठी आलेला  एक ट्रक नंबर प्लेटवरून ओळखला. त्या ड्रायव्हरला इकडे कुणीकडे असे विचारल्यावर तो जरा आश्चर्यचकितच झाला. म्हणाला,‘‘आठवडा झाला मराठी शब्द कानावर नाहीत. येथे लाकूड घेण्यासाठी आलो आहे.’ जवळच तळे होते. तेथेही पाय मोकळे करून आलो.
वेगवेगळय़ा हॉटेल्समधून साईट सिनसाठी तयार असणा:या पर्यटकांसाठी 25 सिटर गाडय़ा असतात. दर 300 रुपये प्रति माणसी असे असतात. ‘अभी राईट देखो..’, ‘अभी लेफ्ट देखो..’ अशा तोडक्या मोडक्या हिंदीत आमच्या गाईडने आम्हाला मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली. रोजा पिक्चरचा शेवटचा सिन जेथे शूट केला ती जागा त्यांनी गाडीतूनच दाखविली. अन्य बारीकसारीक स्थळेही गाडीतूनच दाखविली.
        प्रत्येक ठिकाणी उतरल्यावर आपल्या भोवती गाईड विक्रे ते यांचा गराडा पडतो. काही ठिकाणी विविध चहांच्या मळय़ातून चहाची पावडर विक्रीस आलेली असते. चॉकलेटच्या स्वादाचा चहा मी जरूर पिला. आपल्या काही अजून चहा पावडर हवी असल्यास तेथील विक्रे ते आपल्याला विविध कपांतून चहाची चव चाखायला देतात. ते ही फूकट.

बोटॅनिकल गार्डन :

या गार्डनची निमिर्त्ती 1848 साली झाली. या ठिकाणी सुरेख हिरवळ असून, विविध आकारातील झाडांची कटिंग पक्षी, प्राणी यांच्यावर नकला केल्या आहेत. मे महिन्यामध्ये  वार्षिक वेगवेगळय़ा प्रकारची छोटी झाडे, फुले यांचे येथे प्रदर्शन भरते, असे गाईडने सांगितले. 55 एकरात येथे विविध झाडे, विशेषत: गुलाबाची  झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे येथे फोटो काढता येतात.

डोडाबेट्टा :

हा पाईंट उटी मधील सर्वात उंच समजला जातो. 2623 मीटर उंच हा पाईंट आहे.उटीपासून 1क् किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे. वातावरण स्वच्छ होते त्यामुळे दुर्बिणीतून उटीचा परिसर दिसतो.


हिंदीसह अन्य भारतीय भाषांतील पिक्चरचे शूटिंग याच परिसरात चालू असते. रोजा, राज यासारखे पिक्चरची शुटिंग येथे केल्याचे आमच्या गाईडने सांगितले. त्या जागाही दाखविल्या.  हे ठिकाण निलिगरी पर्वतशृंखलेत आहे. हिरवीगार झाडी, चहाचे मळे, थंड पण आल्हाददायक वातावरण असते. हे ठिकाण तमिळनाडू राज्यात असले, तरी इथून केरळ आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमाही जवळच आहेत. समुद्रसपाटीपासून उटी सुमारे 2500 मीटर्स उंचीवर आहे.  येथे वर्षभर भाजीपाला पिकवला जातो.
या थंड हवेच्या ठिकाणी हिरवीगार कुरणो व घनदाट अरण्ये आहेत. शहराच्या मध्यभागी एक तलाव असून त्याठिकाणी नौकाविहार करता येतो.   फोटोग्राफीसाठी हे ठिकाण मस्तच आहे. ऐतिहासिक स्थळं येथे  नाही. चहाचे मळे, आणि ऊटी लेक इथं वेळ घालवता येतो.   
 कोईबत्तुर ते उटी साहेबासारखा कारमध्ये बसून आलो होतो. अर्थातच त्याचे पैसेही तेवढेच मोजले होते. येताना थोडी चौकशी केली. उटी ते कोईबत्तुर हे अंतर 100 किलोमीटर असल्याचे समजले. येथे आपल्यासारख्या एसटी बसेस आहेत. स्थानिक बसेस उत्तम आहेत. केवळ 55 रुपयांत कोईबत्तुरला पोहचलो. तेथून कोईबत्तुर बसस्टॅंड वरून स्टेशनकडे रिक्षा करून आलो. जेवण उरकून कोईबत्तुरला दुपारी 4 ची रेल्वे होती. दुस:या दिवशी रात्री 11.30 पुण्यात आलो.  


पाईंटचे नाव आठवत नाही. पण येथे बरेच हिंदी चित्रपटांची गाणी शूट झाली आहेत. उदा. दिवाना.



उटीमधील बोटींग गार्डन.



बोटॅनिकल गार्डन


बोटॅनिकल गार्डन




उटीतील डोंगर उतरावर लावलेले चहाचे मळे.


उटी ते कोईंबत्तूरमधील रस्ता.


डोडाबेट्टा येथून दिसणारे दृश्य.


राज पिक्चर, साजन यातील गाणांची शूटिंग येथे झाल्याचे सांगितले जाते.

बोटॅनिकल गार्डन


उटीतील डोंगर उतरावर लावलेले चहाचे मळे.


 

4 comments:

Meena said...

Photos chan ahet

Nishikant said...

धन्यवाद

Unknown said...

मस्त.. प्रवाही मूड पकडला आहेस लेखनातही.. !

Nishikant said...

प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.

कॉपी करू नका