पिंपरी चिंचवड परिसर

पिंपरी चिंचवड परिसर


पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत महानगरपालिका म्हणून नावारुपाला आली आहे. मोठमोठे रस्ते, मोठे पूल, मोठे औद्योगिक प्रकल्प त्यामुळे औद्योगिकनगरी म्हणूनही जगाच्या नकाशावर उदयास आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पर्यटनाला मोठा वाव आहे.
       शहराला सांस्कृतिक, तसेच धार्मिक वारसाही लाभला आहे. देहू, आळंदी यासारखी तीर्थस्थाने तर लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या सारखे गड काहीच अंतरावर आहे.  खडकीपासून ते लोणावळय़ार्पयत असे शहर विस्तारले आहे. देहूरोड, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, लोणावळा, तळेगाव नगर परिषद व अन्य शासकीय संस्थाही येथे आहेत.
       पिंपरीला इंद्रायणी, डेक्कन, सिंहगड अशा रेल्वेगाडय़ाही थांबतात. संत तुकारामनगरला असलेले एस.टी बसस्थानक व पुणे शहरापासून सातत्याने असणारी बसची सेवा यामुळे पर्यटक सध्या येथे वळू लागले आहेत.
मुंबईकडून येताना जुन्या पुणे - मुंबई रस्त्यावर निगडी हे प्रवेशद्वार मानले जाते. येथे जकात नाक्याशेजारीच भक्ती-शक्ती शिल्पाची निर्मिती करण्यात आली. थेरगावातील डांगे चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, भोसरी येथे लांडेवाडी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, नवीनच उभारलेली सायन्स सिटी शहराची वैशिष्टय़े आहेत.

शहरात सर्वाना आवडणारी पर्यटन स्थळे आहेत. त्या विषयी.

No comments:

कृपया आपली प्रतिक्रिया येथे टाईप करा.

 photo comments_zpsc0e65c41.gif