03 March 2013
पु. ल. देशपांडे बाग
लाल महालातून निघालो. एव्हाना साडे सहा वाजले होते. रस्त्यात गर्दी वाढली होती. वाटेत दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेऊन स्वारगेटला पोचलो तेथून पार्वतीच्या जवळच्या रस्त्यावरून पु. ल. देशपांडे उद्यान पाहण्यासाठी गेलो. पु. ल. देशपांडे उद्यान हे सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळील उद्यान. उद्यानाबाबत बरेच दिवसांपासून ऐकले होते. येथे हिंदी पिकचर बॉडी गाडचे चित्रीकरण झाले होते. उदयाना दोन विभागात विभागाले आहे. पहिल्या उदयानात हिरवळ, गुलाबाची झाडे आहेत. तर दुसºया उद्यानात मनाला मोहन टाकणारे कारंजे आहेत. रविवार असल्याने गर्दी होती. पाच मिनिटे रांगेत उभे राहून उद्यानात जाण्यासाठी प्रवेशिका घेतली. माणसी ५ रुपये असा दर आहे. उद्यान छान आहे. चारही बाजुला गुलाबाची झाडे लावलेली होती. विशेष म्हणजे फुलं होती. जसजशी रात्र होऊ लागली तशी येथे लावलेली कारंजे मनाला मोहून गेली.
एक रविवार सत्कर्मी लावल्याचा आनंद होऊन घरी परतलो.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा.