काही इतर पाने

Thursday, September 19, 2024

कासारसाई धरण

नेहमीच पर्यटकांनी गजबजून गेलेली लोणावळा, मावळ व मुळशी येथील धरणे. याला अपवाद म्हणता येणार नाही परंतु हिंजवडी आयटी पार्क शेजारीच असणारे कासारसाई धरण परिसर अजून तरी पर्यटकांना फारसा माहिती नाही. शनिवार रविवार आयटी पार्कमधील पर्यटक या ठिकाणी आवर्जुन येतात ते बोटिंग करण्यासाठी. मावळता सूर्य, निळे, रंगीबेरिंगी
आभाळ पाहून कामाचा ताण नक्कीच कमी होतो. 



रस्त्याची वाट :
बोटिंग करण्यासाठी जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, दीड किलोमीटरचे अंतर कच्चा रस्ता आहे. पर्यटकांना याचा ही छान अनुभव येतो. एकतर रस्ता छोटा त्यात हौशी पर्यटकांनी रस्त्याकडेला वाहने थांबवून अजूनच गर्दी केलेली असते. 
या ठिकाणी अनेक उत्साही पर्यटक धरणात पोहण्यासाठी उतरतात. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकजण आतापर्यंत येथे मृत्यूमुखी पडले आहेत. 









कसे जाल : मुंबई दिशेने येताना शिरगाव (साईबाबा) गावातून सुमारे 12 किलोमीटरवरील या धरणाकडे जाता येते.
तसेच हिंजवडीमधून माणमार्गे जाता येते. 

उपद्रव शुल्क : ५० रुपये उपद्रव शुल्क आकारला जातो. 
तिकीट : बोटिंग करण्यासाठी प्रति व्यक्ती १००, १५० असा दर आहे. यामध्ये पायाने चालविण्यापासून ते मोटार बोट देखील उपलब्ध आहे. १५ ते २० मिनिटांसाठी. तसेच या ठिकाणी हॉटेल्स, लहान मुलांसाठी खेळ आहेत. 

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा.