हा रस्ता काही प्रमाणात चांगला रस्ता आहे. परंतु दिवसाढवळ्या गेलेले बरे कारण काही रस्ता घनदाट जंगलातून व निर्मुष्यवस्तीतून जातो. वाटेत पंक्चरची दुकाने, पेट्रोलपंप मिळणार नाही. वाटेत धामणी, हरवंडी, खराबाचीवाडी आदी छोटे गावे लागतात. सुमारे २५ किलोमीटर अंतरासाठी आम्हाला पाचाडला पोहचण्यासाठी पाऊणतास लागला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी उभारलेली मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून रायगडाचे महत्त्व आहे. निजामपूर मार्गे पाचाडला पोहाचलो. जिजाबार्इंची समाधी या पाचाडला आहे. वृद्ध झाल्यामुळे जिजाबार्इंना गडावर येणे शक्य नव्हते. त्यामुळे महाराजांनी त्यांच्यासाठी खाली पाचाडला वाडा बांधून दिला. पाचाडला सध्या जिजाबार्इंची समाधी आहे. समाधीचे दर्शन घेऊन
रायगडवर जाण्यासाठी निघालो.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा.