२० मे २०१३
अष्टविनायकांपैकी
एक असलेला मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी थांबण्याचे हे माझे आवडते
ठिकाण. बारामती - मोरगावमार्गे सासवड या रस्त्यावर मोरगावाचे हे मंदिर
आहे. या पूर्वीही या मंदिराविषयी लिहिले आहे. गाडी पार्किंगसाठी या ठिकाणी
मोठे स्वतंत्र पटांगण असून, गाडी पार्किंगच्या ठिकाणी एक प्राचीन मंदिर
असल्याचे दिसून आले. मयुरेश्वराचे दर्शन घेऊन गाडी पार्किंगच्या ठिकाणी हे
शंकराचे छोटे मंदिर आहे. मंदिर तसे छोटेच पण बाहेरील कलाकुसरीवरून छान
वाटले. इतर मंदिराच्या मूर्तीप्रमाणे द्वारपालाच्या मूर्तींचे नुकसान
झाल्याचे येथे दिसते. हे द्वारपाल आहे की कुठल देव ते समजले नाही. परंतु या
दोन्ही द्वारपालांचे चार हात असून, चारही हातात आयुधे आहेत. एका हातात
शस्त्र, दुसºया मागील हातात शंख व तिसºया हातात चक्र आहे. अन्य हात
मूर्तीभंजकांनी तोडले आहे. दोन्ही द्वारपालांच्या पायात तोडे, कंबरेला
कटीवस्त्र, कमरपट्टा, मेखला, गळ्यात नक्षीदार माळ, बाहूंना बाजूबंद, कानात
कुंडले, डोक्यावर नक्षीदार सावलीसाठी धरलेले दगडी छत्र अशी त्यांची रचना
आहे. शेजारीच पाच अन्य मूर्ती या मूर्तीपेक्षा लहान आकारात कोरलेल्या दिसून
येतात. याही मूर्ती थोड्याप्रमाणात तोडल्या गेल्या आहेत. मुख्य मंदिरात
मात्र एवढे कोरीवकाम आढळून येत नाही. गाभाºयात शंकराची पिंड असून, दर्शनी
भागावर सिंहाची प्रतिमा कोरलेली दिसून येते. छोटासा पण कोरीवकाम असलेला
नंदी आहे.
मंदिराला कळस
नाही. मुस्लिम राजवटीत बहुधा याही मंदिराला तडाखा बसल्याचे दिसून येते.
नंतरचे बांधकाम १८ ते १९ व्या शतकात केल्याचे दिसून येते. आजुबाजूच्या
स्थानिक दुकानदारांकडे चौकशी केली असता मंदिर शंकराचे असून, बाकी माहिती
माहित नसल्याचे सांगण्यात येते. शंकराचे दर्शन घेऊन पुढे पांडेश्वरला
जाण्यास निघालो.
![]() |
द्वारपाल |
पांडेश्वरचे शिवमंदिर
पुण्यापासून अंदाजे ४५ किलोमीटरवर
असणारे सासवड हे शंकराच्या मंदिरासाठी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. निरा,
बारामती, मोरगाव या गावांना जाण्यासाठी येथूनच जावे लागते. श्री क्षेत्र
जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेल्यानंतर पर्यटक नारायणपूर किंवा
अष्टविनायकापैकी एक असणाºया मोरगावच्या मोरेश्वरला जातात. परंतु थोड्याश्या
आडवाटेने गेल्यास प्राचीन वास्तुकला पहावयास मिळते. अर्थात पांडेश्वर हे
ठिकाण पर्यटकांना आकर्षित करेलच असे नाही. परंतु ज्यांना प्राचीन मंदिरे व
वास्तूकला पाहण्याचा नाद आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण छान आहे.
सासवड येथून कऱ्हा नदी वाहत येते. या नदीच्या काठावर प्राचीन काळी
शिवमंदिरे बांधली गेली. नदीच्या काठी गावे वसली गेली व काठावर मोठे घाट
बांधून शिवशंकराची मंदिरे उभारली गेली. असेच एक शिवशंकराचे प्रसिद्ध व जुने
मंदिर पाहण्यासाठी मोरगाव येथून मयुरेश्वराचे दर्शन घेऊन थोडी वाट वाकडी
करून पांडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी निघालो. संध्याकाळचे ६.०० वाजून गेले
होते. सूर्यास्ताला काही वेळ शिल्लक होता. थोडी हिंम्मत करून पांडेश्वरकडे
जाणाºया डांबरीरोडवरून गाडी पुढे नेली. काही अंतरावरच चांगला डांबरी रस्ता
संपला व सुरू झाला दगडी व काही काळानंतर सुधारेल असा दगडी रस्ता. तब्बल दोन
एक किलोमीटर या छोट्याश्या रस्त्यावरून आम्ही निघालो होतो. वाटेत गाडी
पंक्चर होण्याची मनात भीती होती. पण सुदैवाने तसे काही घडले नाही. अन्यथा
या नवख्या ठिकाणी अवघडच होते. १५ ते २० मिनिटांनी दगडी रस्ता संपवून काही
अंतरावरून पांडेश्वराचे मंदिर दिसले. मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी पांडेश्वर
गावातून रस्ता जातो. गावाच्या पारावर बसलेल्या ग्रामस्थांना रस्ता
विचारल्यानंतर थेट असेच पुढे जा असे त्यांनी सांगितले. येताना रस्ता खूपच
खराब होता असे सांगितल्यावर सासवड-नाझिरे मार्गे सुद्धा येता येते असे
गावकऱ्यांनी सांगितले.
गाव
प्राचीनकाळचे असल्याचे येथील काही अवशेषावरून दिसून येते. मंदिराकडे
जाणाऱ्या वाटेवर एक वीरगळ आणि त्याशेजारीच नागाची प्रतिमा कोरलेला एक दगड
आहे.
![]() |
मंदिराच्या रस्त्यावर असलेली प्राचीन नागप्रतिमा व वीरगळ. |
![]() |
मंदिराच्या समोरील मनोरा |
![]() |
मंडपातला नंदी |
![]() |
मनोºयाच्या आतमधून वर जाण्यासाठी आतील बाजूस असलेल्या पायºया |
मुख्य मंदिर :
या
मंदिराला शिखर, दगडी मंडप, नदीकाठी तट, मराठाकालीन भित्तीचित्रे, मुस्लिम
राजवटीचे बांधकाम असा साज चढवत हे मंदिर पूर्णात्वास गेल्याचे दिसून येते.
वेगवेगळ्या कालावधीत मंदिराचा जिर्णोद्धार झालेला येथील मंदिराच्या
बांधकामावरून लक्षात येते. मंदिरातील विटा चौथ्या शतकात, नंतर सतराव्या व
अठराव्या शतकात मंदिराचे जोडकाम झालेले दिसते. हेमाडपंथी पद्धतीचे हे
मंदिर आहे.
वनवासात असताना पांडवांनी हे शिवलिंग स्थापन केल्याची लोकांची मान्यता आहे.
गाभाºयात भव्य शिवलिंग आहे. इतर मंदिरात जमिनीवर शिवलिंग दिसून येते.
मात्र, या ठिकाणी अंदाजे ५ फूट बाय ५ फूट कोरलेल्या दगडावर हे शिवलिंग आहे.
मंदिरातील लंबगोलाकृती गाभारा व त्या पुढील आयताकृती छताचा सभामंडप आहे.
इतर
मंदिरांप्रमाणेच मुस्लिम राजवटीत व परकीयांच्या अतिक्रमणांमुळे मंदिरातील
मूर्ती वाचू शकल्या नाही. अन्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर दिसणारे द्वारपाल
या ठिकाणी दिसून येतात. अंदाजे पाच फुटी असलेले दोन द्वारपाल सुंदर व
कोरीव शिल्पे असल्याचे दिसून येते. काही प्रमाणात या मूर्तींची तोडफोड
झाल्याचे याही ठिकाणी दिसून येते. या मूर्तीचे मूळचे देखणेपण आपल्याला
प्राचीन दगडी कोरीवकामाबद्दल कुतूहल निर्माण करते. दोन्ही द्वारपालांच्या
पायात तोडे, कंबरेला कटीवस्त्र, कमरपट्टा, मेखला, गळ्यात नक्षीदार माळ,
बाहूंना बाजूबंद, कानात कुंडले, डोक्यावर नक्षीदार निमुळता होत जाणारा
मुकूट, त्यापाठीमागे चक्र व मुकुटावर सावलीसाठी धरलेले दगडी छत्र अशी
त्यांची रचना आहे. मंदिरात मात्र एवढे कोरीवकाम आढळून येत नाही. मंदिराच्या
समोरीला बाजूस दोन्ही द्वारपालांच्या बाजूंना जाळीदार खिडक्या फुलाफुलांची
नक्षी कोरलेली आहे.
![]() |
द्वारपाल |
![]() |
मंदिराचा अंतर्भाग |
![]() |
मंदिराच्या आसपासची पांडवांची मंदिरे |
![]() |
तटाच्या भिंतीत कोरलेल्या मूर्ती |
![]() |
इस्लामिक स्थापत्यशैलीतील कमानदार रचना |
![]() |
धनुधार्री वीराची मूर्ती |
पांडवकालीन मंदिर :
तब्बल सोळाशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात असणाºया मंदिराला काहीना काही इतिहास असतोच. असाच इतिहास येथील पांडेश्वर मंदिरालाही आहे. पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर उभारल्याने या मंदिराला ‘पांडेश्वर’ असे म्हणतात अशी लोकसमजूत आहे. मंदिराच्या आवारात कुंती, धर्म, भीम, नकुल आणि सहदेव अशी लहान मंदिरे बांधलेली दिसली. या छोट्याखानी मंदिरात मूर्ती नसून त्या जागी शेंदूर फासलेले दगड आहेत. अर्जुनाचे मंदिर येथे नाही. मंदिराच्या समोरच आवारात एका धर्नुधारी वीराची मूर्ती असलेला दगड कोरलेला दिसतो. तिलाच अजुर्नाची मूर्ती असल्याचे येथील तरुणांनी सांगितले. मंदिराच्या समोर मुंबईतील कापड गिरणीला असलेल्या चिमणीसारखा मनोरा दिसतो. मजा म्हणजे या मनोºयाच्या आत पायºया असून, वर जाता येते. पण मनोºयाची स्थिती पाहता वर न गेलेले बरे. हा मनोरा कशासाठी बांधला गेला हे समजत नाही. मनोºयाच्या वरती कोरीव काम केल्याचे दिसून येते. मंदिराच्या समोरच भव्य असा नंदीमंडप असून त्यात नंदीची मूर्ती कोरलेली आहे.
मंदिर परिसर :
मंदिराचा परिसर शांत व सुंदर आहे. उन्हाळा असल्यामुळे शेजारून वाहणाºया कºहा नदीच्या पात्रात दगड, कचरा, मोठाले धोंडे, गवताशिवाय काहीच नव्हते. या नदी पात्राला नदी म्हणणे की काय असा प्रश्न आपल्याला पडतो. या नदीवर बांधलेल्या घाटावर हे पूर्वाभिमुख दिशेला हे मंदीर आहे. मंदिराला कºहा नदीच्या बाजूने एक मोठा तट बांधलेला आहे. तटाचे हे बांधकाम बहुधा आदिलशाही काळात झालेले असल्याचे येथे असणाºया तरुणांनी सांगितले. तटाच्या आतल्या भिंतीवर विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. तटात खालची बाजू मुस्लिम शैलीत बांधलेली कमानीची रचना असलेली आहे. तट चांगला रूंद असून आजूबाजूचा परिसर दिसतो. पावसाळ्यात नदी वाहत असल्याने हा परिसर खूपच छान दिसेल.
कसे जाल :
- सासवड ते पुणे हे अंतर 34 कि.मी.
- सासवडपासून पांडेश्वर मंदिर अंदाजे 25 किमी. तर जेजुरीपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे.
- सासवडे नाझिरे मार्गे सुद्धा येथे पोहचता येते. सासवडवरून भुलेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग मुख्य चौकातून आहे. भुलेश्वर येथून 27 किलोमीटर अंतरावर आहे.
आजुबाजूची प्रेक्षणीय स्थळे :
नारायणपूर, जेजुरी, संगमेश्वर, वटेश्वर (चंगावटेश्वर), सिध्देश्वर, केतकावळे, मोरगाव, भुलेश्वर, थेऊर
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा.