नारायणी धाम
लोणावळय़ाला मिसेसची बाल मैत्रिण राहते. त्यांच्याकडे अर्धा तास गप्पागोष्टी केल्या.
तिच्या मिस्टरांनी आम्हाला मग नारायणी धामला पाहिले का विचारले नाव तर ऐकून
होतो. पण गेलो नव्हतो. संध्याकाळचे 6 वाजले होते. तेव्हा चला म्हणालो.
लोणावळय़ाकडून जुन्या मुंबई - पुणे मार्गावरून जायला निघाले की डाव्या
हाताला कैलास प्रभात नावाचे हॉटेल दिसते तेथून अवघ्या दीड किमी अंतरावर
नारायणी धाम आहे. जवळच तुंगार्ली नावाचे छोटे धरणही आहे. मंदिराच्या
शेजारून पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे जातो. नारायणी धाम हे एक पर्यटन स्थळ
म्हणून लवकर प्रसिद्धीस आले. कारण हे मंदिरांपेक्षा काही वेगळेच आहे.
मंदिराचे बाहेरून दिसणारे रुप सुंदर राजवाडय़ाप्रमाणो दिसले. मंदिराच्या
सभोवताली सुरू असलेली पाण्याची कारंजी तर मनमोहक होती. बरेच फोटोसेशन करून
पुढे निघालो. मंदिर सुमारे 5 वर्षांपूर्वी स्थापना केल्याचे समजले.
नारायणी धाम मध्ये श्री. नारायणी देवी, श्री. गणोश व भगवान हनुमान
चंद्रांची मंदिरे आहेत. मुख्य मंदिरात श्री. नारायणी देवीची सिंहावर आरूढ
झालेली मूर्ती आहे. शेजारीच गणेश व हनुमानाचीही सुंदर मूर्ती आहेत.
मंदिराच्या आत छताला मोठे चित्र रंगवलेले आहे. सुंदर नक्षीकाम ही आहे.
भाविकांना देण्यात येणारा प्रसाद सुद्धा छान होता. बहुद्धा डिंकाचा लाडूचा
असावा. भाविकांना बसण्यासाठी खुच्र्या ठेवलेल्या होता. मी प्रथमच मंदिरात
खुच्र्या ठेवलेल्या पाहिल्या. अन्यथा अन्य मंदिरात खाली बसण्यावाचून
वृद्धांना पर्याय नसतो. मंदिराचा परिसर खरोखरच सुंदर व देखाणा आहे. येथे
येणा:या भाविकांसाठी राहण्याची सोय माफक दरात केली आहे. शेजारीच गोशाला
बांधण्यात आलेली आहे. सभागृह समारंभासाठी भाडे तत्वावर दिले जाते. नारायणी
धाम ट्रस्टतर्फे मंदिराच्या आवारात वाचनालय, संगणक प्रशिक्षण केंद्र,
तसेच लहान मुलांसाठी खेळण्याचे मैदान बनविण्यात आले आहे.
तासाभरात मंदिर पाहून मित्राचा निरोप घेतला व रात्री घर गाठले.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा.