पुणे-नगर रस्तावर शिरूर तालुक्यात रांजणगावचा अष्टविनायकातील हा गणपती आहे. हे ठिकाण पुणे जिल्हय़ात येते. मुख्य रस्त्यापासून जवळच मंदिर आहे. अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती. गणपतीला महागणपती असेही म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. हा गणपती उजव्या सोंडेचा आहे. मंदिराचा दरवाजा पूर्वेकडे आहे. देवळाचा मुख्य गाभारा व मंडप अजूनही चांगल्या स्थितीत आहे. मराठेशाहीत अनेक सरदारांनी या देवळाला इनामे दिली होती . मंदिराचे दोनही गाभारे थोरले माधवराव पेशवे यांनी जीर्णोद्धार केला आहे. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तीमान असे महागणपतीचे रूप आहे.
येथील देवस्थान कमिटीने सध्या मोठय़ा प्रमाणात चांगला जीर्णोद्धार सुरू केला आहे. गणपतीचे 5, 10, 15 व 25 ग्रॅम मध्ये चांदीची नाणी येथे विकत मिळतात. देवस्थानने मोठा सभामंडप बांधला आहे. सकाळी व सायंकाळी या ठिकाणीही अन्नछात्रलय आहे. प्रवेशद्वारावर आकर्षक दोन हत्तींचे मोठे पुतळे उभारलेले आहे. मोठय़ा कमानीतून आपण प्रवेश करतो. येथे गाडय़ा पार्किगसाठी मोठे वाहनतळ, स्वच्छतागृह उभारलेले आहे. मंदिराच्या बाहेर परिसरात गावागावातून आलेले शेतकरी भाजीपाला विकत होते. संध्याकाळचे 7 वा. आम्ही रांजणगावला पोहचलो. दर्शन घेऊन पुण्याकडे 7.30 ला निघालो.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा.